Pimpri Chinchwad News : नगर परिषद सीओ नियुक्तीवरून श्रीरंग बारणे आणि सुनील शेळके भिडले...

Sunil Shelke Vs Shrirang Barne : 'महायुतीतले दोन पावरफुल नेत्यांमध्ये वादावादी...'
Sunil Shelke Vs Shrirang Barne
Sunil Shelke Vs Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी (सीओ) अकार्यक्षम एन. के. पाटील आणून मावळचे शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे नगर परिषदेचा बट्ट्याबोळ करून आता घरात बसलेत, अशी घणाघाती टीका मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (अजित पवार गट) सुनील शेळके यांनी नुकतीच (ता. ३) केली होती. त्यावर तसेच प्रत्युत्तर बारणेंकडून अपेक्षित होते. मात्र, त्यांनी उपहासात्मक पद्धतीने उत्तर देत एका वाक्यातच हा विषय संपवला.

Sunil Shelke Vs Shrirang Barne
Women Reservation In Maval : मावळ, शिरूरला महिला खासदाराची प्रतीक्षा; विधानसभेत कोटा पूर्ण, काय आहे गणित?

तळेगावचे सीओच काय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह, पीएमआरडीएचे आयुक्त महिवाल यांनाही मीच आणले, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया बारणेंनी शेळकेंच्या आरोपावर गुरुवारी `सरकारनामा`ला दिली. पूर्वीचे कार्यक्षम सीओ विजय सरनाईक यांची टर्म पूर्ण व्हायच्या आत बदली करून तेथे अकार्यक्षम पाटील यांना बारणेंनी आणले. त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाल्याने आमदार शेळके परवा बारणेंवर चांगलेच भडकले. बारणेंनी स्वत:साठी सीओ आणल्याचा आरोपही शेळकेंनी केला होता.

दरम्यान, आमदारांच्या खासदारांवरील या खळबळजनक आरोपावर त्यांनी पत्रकार परिषद न घेता ती सीईओ पाटील यांनी काल घेतली. आपल्याला कोणी इथे आणले नसून राज्य सरकारच्या आदेशाने आपण आल्याचे त्यांनी सांगितले. तळेगावातील बजबजपुरीवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच अधिकाऱ्यांच्या आड लपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना उत्तरे देण्यास पुढे केले. तसेच तळेगावातील दुरवस्थेचे खापर त्यांनी अगोदरच्या सीईओंवर फोडले.आपण पाचच महिन्यांत शहर खड्डेमुक्त आणि कचरामुक्त केल्याचा मोठा दावा त्यांनी केला. मी २४ तास शहरात उपलब्ध असतो, असे दुसरे न पटणारे वक्तव्यही त्यांनी केले.

Sunil Shelke Vs Shrirang Barne
Karad NCP News : बाळासाहेब पाटलांनी जिंकली न्यायालयीन लढाई; ६२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली

चांगला माणूस कुणालाच आवडत नाही, अशी सारवासारव सीओ पाटील यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कारभारावरील टीकेवर केली. दोन-तीन समाजकंटक माझी बदनामी करीत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यामागे लोकप्रतिनिधी नाहीत, असेही ते लगेच म्हणाले. नगरपरिषदेच्या कामात पूर्वीच मोठी अनियमतता झाली होती, स्टाफ सुस्तावलेला होता, आता त्या सर्व अडचणी दूर करीत आहे, असा दावा त्यांनी केला. अगोदरच्या सीओंनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बेकायदेशीर राबविला होता. तो कायदेशीर करून घेतला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com