Narendra Modi, Supriya Sule, Supriya Sule News Updates, Supriya Sule invitation to Narendra Modi in Indapur sarkarnama
पुणे

मोदींना सुळे म्हणाल्या, 'इंदापूरला या, आम्ही तुम्हाला चार गोष्टी सुचवतो,'

मी संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.

सरकारनामा ब्युरो

इंदापूर : ''आदर्श शहर नावाला स्मार्ट नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये स्मार्ट असावं, असे काम इंदापूर येथे झाले आहे. आदर्श शहर कसं असावं, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांना सांगेन की तुम्ही पण इंदापूरला या! आम्ही तुम्हाला चार गोष्टी सुचवतो,'' असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. (Supriya Sule News Updates)

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथील विकास कामांचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर येथे केलेल्या कामांचे कौतुक सुप्रिया सुळे यांनी केलं.

त्या म्हणाल्या, ''दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल, मी संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो. इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे,''

दौंडचा विकास होत नसल्याची खंत सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. दौंडकडे विशेष लक्ष द्यावे, लागेल असे त्या म्हणाल्या. ''इंदापूर, बारामती आणि पुरंदरमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत परंतु दौंडचे आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे तर दौंडचा विकास रखडत नाही ना,'' असा सवाल सुळेंनी यावेळी उपस्थित केला.

''इंदापूर, बारामती आणि पुरंदरचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, दौंडचा विकास होत नाही. त्यामुळे दौंडकडे जास्त लक्ष द्यायला लागेल,'' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

''महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT