Datta Bharane  sarkarnama
पुणे

MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; दत्ता भरणेंनी शब्द पाळला

एमपीएससी (MPSC) च्या २०१९ च्या यशस्वी उमेदवारांना एमपीएससीकडून शिफारस पत्र व जीएडीकडून ( GAD) साक्षांकन नमुना फॉर्म मेलद्वारे प्राप्त झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

-महेश जगताप

पुणे : एमपीएससी (MPSC) निवड झालेले पण नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ४२० जणांना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे (Datta Bharane) यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. निवड होऊनही गेली दीड वर्ष नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांना ''मी तुमचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती मिळेल अशी व्यवस्था करतो," असा शब्द भरणे यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात दिला होता. तो शब्द भरणेंनी पाळला आहे.

गेल्या आठवड्यात 'साम' आयोजित एमपीएससी विद्यार्थी परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी निवड होऊनही गेली दीड वर्ष नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांना ''मी तुमचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती मिळेल,'' अशी व्यवस्था करतो व या परिषदेमध्ये विवेक पाटील ( निवड डीवायएसपी) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रात्री बारा वाजण्याच्या आत मी कॉल करून मी केलेला पाठपुराव्याची माहिती देतो,'' असा शब्द दिला होता. भरणेंनी दिलेला शब्द पाळल्याची चर्चा विद्यार्थी वर्गात होत आहे.

''भरणे यांनी रात्री त्याच दिवशी ११ . ४५ ला मला कॉल केला. व दुसऱ्या दिवशी देखील कॉल करून केलेली कार्यवाही आम्हाला ज्ञात करून दिली ( GAD) जीएडीच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौमिक यांच्याकडून पाठपुरावा करून आमच्या नियुक्तीच्या सहीसाठी फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे . त्यामुळे एमपीएससीच्या २०१९ च्या यशस्वी उमेदवारांना एमपीएससीकडून शिफारस पत्र व जीएडीकडून साक्षांकन नमुना फॉर्म मेलद्वारे प्राप्त झाला आहे. जीएडी येणाऱ्या २० ऑक्टोबरच्या अंतिम निकालाविरुद्ध च्या केस मध्ये पूर्ण तयारीनिशी उतरेल, असे आश्वासन जीएडीकडून मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात नियुक्ती पत्र मिळणे व प्रशिक्षणाची तारीख मिळणे अपेक्षित आहे असे विवेक पाटील यांनी ''सरकारनामा''शी बोलताना सांगितले.

निवड होऊनही नाकारलेल्या नियुक्त्या, न्यायालयातील दाव्यामुळे लांबलेली प्रक्रिया, लाँकडाउनमुळे संपलेली वयोमर्यादा, सरळसेवेतील गोंधळ, विद्यावेतनाचा प्रश्न आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भरडलेल्या उमेदवार या प्रश्नांची योग्य दखल शासन दरबारी घेणार असल्याचे आश्वासन भरणेंनी विद्यार्थ्यांना दिले आहे .

निवड प्रक्रिया पारदर्शक आणि सक्षमपणे व्हावी, सरळसेवा भरती एमपीएससीच्या माध्यमातून घ्यावी, प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा मागण्या विद्यार्थ्यांनी या परिषदेवेळी केल्या होत्या व मागण्यांची दखल घेताना शासन दरबारी हालचाल होत असल्याचे दिसत आहे .

''मी प्रशासनाचा घटक म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव आहे त्यानुसार मी काम करीत असतो,'' असे भरणे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT