मुकुंद किर्दत
मुकुंद किर्दत  सरकारनामा
पुणे

‘आप’चे मुकुंद किर्दत म्हणतात; निवडणुकीच्या तोंडावर हे खेळतायेत नुरा कुस्ती

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही वर्षात संघटीत गुन्हेगारीला राजकीय आशीर्वाद असल्याच्या घटना पुणेकरांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचे बदलते स्वरूप सरळमार्गी पुणेकरांना धास्तावणारे आहे. पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींची उपस्थिती आणि त्याचे समर्थन हे खेदजनक आहे. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप म्हणजे नुरा कुस्तीचा प्रकार आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी कली आहे.

गेल्या काही वर्षात पुण्याच्या आसपास मुळशी पॅटर्न तयार झाला आहे. त्यामागे बेरोजगारी सोबत जमीन व्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप ही तीन प्रमुख कारणे आहेत.राज्याचे माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख हे गायब आहेत.राष्ट्रवादीचे काही नेते तर जमीन हडप करण्याच्या कामात कुप्रसिद्ध आहेत.

दुसरीकडे स्थानिक गुंडाची उपस्थिती आणि दोन दिवसांपूर्वी उघड झालेली भाजपाच्या नगरसेवकाने केलेली ठेकेदाराची मारहाण, उचलबांगडी ह्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी कांग्रेस एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.एकमेकांशी तडजोड करून ‘तेरीभी चूप , मेरीभी चूप’ असे धोरण अवलंबणारे हे प्रस्थापित पक्ष आता केवळ महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यामुळे एकमेकांवर तुटून पडत आहेत, असा आरोप किर्दत यांनी केला आहे.

गुंडगिरीचे भूत आता पुढील काळात पुणेकरांच्या मानगुटीवरून उतरवण्यासाठी आता पुणेकरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. मतपेटीच्या माध्यमातून स्वच्छ प्रतिमेचा आणि जन सामन्यांच्या अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आम आदमी पार्टी चा पर्याय म्हणून विचार करेल अशी खात्री आहे.गुंडगिरीवर वरदहस्त ठेवणारे राजकीय पक्षच आता निवडणुकीच्या तोंडावर नुराकुस्ती खेळत आहेत.गुंडगिरीचे हे भूत पुणेकरांनी या निवडणुकीत उतरविण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे किर्दत यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT