पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने; उरले केवळ ७९२ रूग्ण

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्यादेखील तीन हजारांहून कमी झाली आहे.
Corona Pune
Corona PuneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे शहरात आता एकूण फक्त ७९२ कोरोना रुग्ण उरले राहिले आहेत. या रुग्णांपैकी ४३५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित ३५७ जण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णांची ही आकडेवारी शुक्रवार (ता.२९) पर्यंतची आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्यादेखील तीन हजारांहून कमी झाली आहे.

Corona Pune
महापौर मोहोळ म्हणाले;...तर जगतापांना किंमत मोजावी लागेल

शुक्रवारी (ता.२९) दिवसभरात पुणे जिल्ह्यात केवळ २३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांतील एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ५७ नवीन रुग्णाचा समावेश आहे. दिवसात ३९८ जण कोरोनामुक्त झाले असून अवघ्या एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण हा पिंपरी चिंचवडमधील असून, पुणे शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Corona Pune
सरकारचं नवं फर्मान येतयं : शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार

दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९६, नगरपालिका हद्दीत १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ११०, पिंपरी चिंचवडमधील ९८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १७५ आणि नगरपालिका हद्दीतील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण २ हजार ९६२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १ हजार ३७३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ५८९ हे गृह विलगीकरणात आहेत.जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज रात्री जिल्ह्यातील कोरोना रुग्णस्थितीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com