Traditional kushti match in Mulshi turned controversial after wrestler Sikandar Sheikh was attacked inside the arena during a Mahashivratri event. Sarkarnama
पुणे

Sikandar Sheikh attack : मुळशीत कुस्तीला गालबोट! मैदानात घुसून सिकंदर शेखवर हल्ला; आखाड्यातील धक्कादायक VIDEO व्हायरल

Mulshi Sikandar Sheikh attack : मुळशीतील पौड गावात महाशिवरात्रीनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजिक करण्यात आली होती. माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख यांच्यात तब्बल अकरा लाखांची निकाली कुस्ती लागली होती. ही कुस्ती पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Jagdish Patil

Pune News, 20 Feb : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत संतापजनक प्रकार घडला आहे. तो म्हणजे मैदानात कुस्ती सुरू असताना थेट आखाड्यात घुसून महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

हल्ल्याचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर हा हल्ला पैलवान माऊली कोकाटे याच्या समर्थकांनी केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे कुस्तीला गालबोट लागल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशीतील पौड गावात महाशिवरात्रीनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजिक करण्यात आली होती. माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख यांच्यात तब्बल अकरा लाखांची निकाली कुस्ती लागली होती. ही कुस्ती पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या कुस्तीसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच रोहिदास आप्पा हे उपस्थित होते. माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख यांच्यातील कुस्ती जवळपास तासभर सुरू होती. कोणीच कुणाला चितपट करू देत नव्हतं. तर दुसरीकडे आयोजकांकडून कुस्ती निकाली लागल्याशिवाय थांबवली जाणार नसल्याची अनाऊन्समेंट सुरू होती.

अशातच दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या मानेवर वारंवार फटके मारायला सुरूवात केली. सुरूवातीला हा कुस्तीचा भाग असल्याचं लोकांना वाटलं. मात्र, त्यानंतर दोघे आक्रमक झाले आणि दोन्ही पैलवानांमध्ये जोरदार झुंज सुरू झाली.

अशातच मैदानाबाहेरून अचानक काही तरूण आले आणि त्यांनी थेट सिकंदर शेखला मारहाण केली. थेट आखाड्यात जाऊन सिंकदवर हल्ला झाल्याने मैदानात एकच गोंधळ उडाला. तर हल्ला करणारे माऊली कोकाटेचे समर्थक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेनंतर आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही पैलवानांना विजयी घोषित केलं आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे कुस्तीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT