Sunil Shelke: "मावळमध्ये EVM हॅकिंगसाठी भाजप नेत्याने पैसे उकळले"; राष्ट्रवादीच्या आमदाराकडं पुरावे? मुख्यमंत्र्यांकडं करणार सुपूर्द

Maval EVM Hacking Allegation : मावळमध्ये ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली पैसे उकळल्याचा गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेते बाळा भेगडे यांच्यावर केला आहे. याचे पुरावेही आपल्याकडं असून ते आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिल्यानं राजकीय वाद तीव्र बनला आहे.
MLA Sunil Shelke addressing a press conference in Maval regarding EVM hacking allegations against BJP leader Bala Bhegade.
MLA Sunil Shelke addressing a press conference in Maval regarding EVM hacking allegations against BJP leader Bala Bhegade.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मावळमध्ये सध्या महायुतीतील मित्र पक्षांमध्येच मोठा संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पैसे उकळण्याचा खळबळजनक आरोप केला आहे. याचे आपल्याकडं पुरावे असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पण पैसे उकळल्याचा आरोप आठ दिवसांत सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा भाजचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला आहे. त्याला आता सुनील शेळके यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी 'ईव्हीएम हॅक' करून देऊ असं सांगत, मावळ तालुक्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अर्थात बाळा भेगडे यांनी आपल्याच उमेदवारांकडून 25 ते 35 लाख रुपये उकळले आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता.

शेळकेंचे हे आरोप बाळा बेगडे यांनी फेटाळून लावले आहेत. बाळा भेगडे म्हणाले, "आठ दिवसांत सुनील शेळके यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. तसेच आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून बाजूला होऊ"

भेगडेंच्या या इशाऱ्याविरोधात गुरुवारी सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. शेळके म्हणाले, "तुम्हाला खरंच सन्मान अभिमान आणि अब्रू असेल तर दहा दिवसाच्या आत तुम्ही कोर्टामध्ये जाच. पाहिजे असेल तर मी आणखी दहा दिवस थांबतो पण तुम्ही माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा"

MLA Sunil Shelke addressing a press conference in Maval regarding EVM hacking allegations against BJP leader Bala Bhegade.
Maval News: ‘मामा-भाचा ’एकत्र! मावळमध्ये राजकीय समीकरणांना मिळणार नवी दिशा

मला कोर्टाकडून समन्स येऊ द्या त्यानंतर मी कोर्टात पुरावे सादर करीन, पण त्या अगोदर मी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात यासंदर्भात तक्रार देणार आहे. आता सुरू होणाऱ्या अधिवेशनात मी याबाबतचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचा इशाराही यावेळी आमदार शेळके यांनी दिला.

MLA Sunil Shelke addressing a press conference in Maval regarding EVM hacking allegations against BJP leader Bala Bhegade.
Bala Bhegade: भेगडेंचा शेळकेंना इशारा! आरोप आठ दिवसांत सिद्ध करा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू

'ईव्हीएम हॅक' संदर्भातील माहिती मला कुठल्याही भविष्य सांगणाऱ्याने दिली नसून उमेदवारांच्या भावाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच दिली आणि ती पुराव्यानिशी दिली आहे. तसंच कोणाच्या खात्यावर किती पैसे दिले आहेत? कोणत्या खात्यावर पैसे गेले आहेत? याबाबतची सर्व माहिती आम्हाला मिळाली आहे, असा ठाम दावाही आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com