Murlidhar Mohol Oath Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol Oath : 'मी मुरलीधर किसन मोहोळ, शपथ घेतो की...'

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : नरेंद्र मोदींच्या 3.0 सरकारमध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मोहोळ यांच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी रविवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी गोपनियतेची शपथ घेतली. 'मी मुरलीधर मोहोळ...' असे म्हणताच पुणेकरांनी एकच जल्लोष केला. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर मोहोळ Murlidhar Mohol यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला होता. मोदी यांच्या बरोबर मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या 41 खासदारांसोबत मोहोळ यांचाही सहभाग असल्याचे माहिती देण्यात आली. मंत्रिमंडळात सामावून घेतलेल्या मोहोळ यांना आता कोणते मंत्रिपद मिळणार याचीच चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी मिळताच मोहोळ यांनी हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त केली होती. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. बुथ कार्यकर्ता केंद्रीय मंत्री होतो हे भाजपमध्येच होऊ शकते. आता मिळालेल्या या मोठ्या संधीचे सोने करत पुण्यासह,महाराष्ट्र आणि देशाच्या विकासावर भर देणार आहे, असेही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.

मंत्रिमंडळात सहभागी करणे हा माझा एकट्याचा नाही तर संपूर्ण पुणेकारांचा सन्मान असल्याचेही मोहोळ म्हणाले. तीस वर्षानंतर पुण्याला ही संधी मिळत आहे, त्यामुळे सर्व पुणेकारांना आनंद झाला आहे. पुणेकरांमुळेच माझा प्रवास इथपर्यंत आला आहे. आता नवीन जबाबदारीतून माझे पुणे, महाराष्ट्र असेल एकूण देशाची सेवा करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 चा विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT