Narendra Modi Oath Ceremony Live Update : मोदींच्या टीममध्ये ‘हे’ असतील मंत्री; वाचा पक्षनिहाय संपूर्ण यादी

Modi Government Modi Cabinet Oath Ceremony Latest Update : शपथविधीसाठी देशभरातील जवळपाच पाच डझन खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये जवळपास चार डझन मंत्री भाजपमधील असतील.
Narendra Modi oath Ceremony
Narendra Modi oath CeremonySarkarnama

New Delhi : राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात सायंकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत जवळपास पाच डझनहून अधिक खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपमधील प्रमुख नेत्यांसह घटकपक्षांतील खासदारांचाही यामध्ये समावेश असेल.

भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना काही महत्वाची खाती द्यावी लागणार आहेत. त्यामुळे मागील दोन टर्ममध्ये भाजपकडे असलेली खाती घटकपक्षांना द्यावी लागणार आहेत. असे असले तरी मंत्रिमंडळात भाजपचेच वर्चस्व राहणार आहे.

मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील टीममध्ये अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांसह महाराष्ट्रातील पाच जणांना संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्य आण त्यानुसार घटकपक्षांना संधी दिली जाणार आहे. या संभाव्य नावांमध्ये भाजपचे 50 हून अधिक खासदार आहेत.

संभाव्य मंत्र्यांची यादी -  

भारतीय जनता पार्टी - अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, एस. जयशंकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, प्रल्हाद जोशी, ज्योतिरादित्य सिंधिया, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, बंडी संजय, जी किशन रेड्डी, हरदीप सिंह पुरी, शिवराज सिंह चौहान, शोभा करंदलाजे, रवनीत सिंह बिट्टू, सर्वानंद सोनोवाल, अन्नपूर्णा देवी, जितिन प्रसाद, मनोहर लाल खट्टर, हर्ष मल्होत्रा, नित्यानंद राय, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, श्रीपाद नाईक, चंद्रकांत पाटील, गिरिराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, राव इंद्रजीत सिंह, कृष्णपाल गुर्जर, शंतनू ठाकुर, बी. एल. वर्मा, अजय टमटा, सावित्री ठाकुर.

Narendra Modi oath Ceremony
Swearing in Ceremony of Narendra Modi : ‘इंडिया आघाडी’तील एकच नेता मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार

तेलुगु देसम पार्टी - राम मोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मासानी

संयुक्त जनता दल – ललन सिंह, रामनाथ ठाकुर

राष्ट्रीय लोकदल – जयंत चौधरी

हम पार्टी - जीतनराम मांझी

लोक जनशक्ती पार्टी - चिराग पासवान

जनता दल (धर्मनिरपेक्ष) - एच डी कुमारस्वामी

शिवसेना - प्रताप राव जाधव

रिपब्लिकन पार्टी - रामदास अठवले

अपना दल - अनुप्रिया पटेल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com