Rahul Gandhi  sarkarnama
पुणे

Rahul Gandhi court statement: मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींनी कोर्टात दिली लेखी माहिती

Rahul Gandhi vote rigging News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याच्या आरोपाखाली राहुल गांधी यांच्यावर पुण्यात खटला दाखल आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी हे लेखी निवेदन न्यायालयात सादर केले.

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे लेखी निवेदन काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलाने पुण्यातील विशेष न्यायालयात सादर केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याच्या आरोपाखाली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर पुण्यात खटला दाखल आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी हे लेखी निवेदन न्यायालयात सादर केले.

मिलिंद पवार यांनी न्यायालयाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारतीय जनता पक्षाचे (BJP)नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधी यांना इशारा देताना म्हटले आहे की, त्यांनी योग्य वर्तन ठेवावे, अन्यथा त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखी परिस्थिती त्यांच्यावर येऊ शकते. तसेच, भाजपच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना "दहशतवादी" संबोधले आहे.

सध्याच्या राजकीय वातावरणाचा विचार करता आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी सावरकर यांचे गोडसे कुटुंबाशी असलेले नाते लक्षात घेता, राहुल गांधी यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या लेखी निवेदनात पुढे असेही नमूद आहे की, राहुल गांधी यांना भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास आहे. तरीही, या खटल्याच्या प्रगतीसोबतच वाढणारा राजकीय दबाव आणि बाह्य प्रभाव याची न्यायालयाने नोंद घ्यावी.

ज्या विचारसरणीच्या व्यक्तींनी हा खटला दाखल केला आहे, ती विचारसरणी धार्मिक सौहार्द बिघडवणे, निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणे आणि विशिष्ट उद्योजकांचे हितसंबंध जपणे यासाठी ओळखली जाते, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी कट्टरपंथीयांकडून आपल्या जीवाला संभाव्य धोका असल्याचे राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात लेखी स्वरूपात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT