Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : भटकती आत्मा ते भ्रष्टाचारींचे सरदार; पवारांवरील टीका भाजपला विधानसभेत तारणार की मारणार?

Amit Shah in Pune : भाजप सरकारमध्ये मराठा आरक्षण लागू होते, तर शरद पवारांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण गायब होते, असे शाह म्हणाले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political New : लोकसभा निवडणुकीच्या झंझावातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुण्यात येऊन भटकती आत्मा अशी टीका केली होती. मोदींच्या या पवित्र्यावर राज्यभरात नारजीचे सूर उमटले. त्याचा निवडणुकीत फटका बसेल असे अंदाज पुढे आले आणि तसे घडलेही.

मोदींच्या घणाघाती हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांना टार्गेट केले. मोदींच्या भटकती आत्म्यानंतर शाह यांनी पवारांचा भ्रष्टाचारींचे सरदार असा उल्लेख केला. त्यामुळे लोकसभेत पवारांवरील टीका भाजपला महागात पडली असून शहांची टीका भाजपला विधानसभेत तारणार की मारणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी Narendra Modi जिल्ह्यातील लोकसभेतील एनडीएच्या चार उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्याचा फटका राज्यभरातील भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात.

लोकसभेत झालेल्या पडझडीवर चिंतन करण्यासाठी पुण्यात आज भाजपचा मेळावा झाला. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली.

शरद पवारांचे सरकार असले की मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. ते खोटे नरेटिव्ह पसरवतात. तसेच शरद पवार हे देशातील भ्रष्टांचारांचे सरदार असल्याचे आरोप शहांनी केले. ते म्हणाले, राज्यात 2014 मध्ये भाजपचे सरकार होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले.

त्यानंतर शरद पवारांचे सरकार आणि आणि आरक्षणाचा मुद्दा गायब झाला. आता पुन्हा भाजपचे सरकार असून आरक्षणाबाबत हालचाली सुरू आहेत. पुढे पवारांचे सरकार आले तर हा मुद्दा पुन्हा गायब होण्याची शक्यता असल्याचे शाह Amit Shah म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे बोलून मते घेतल्याचा उल्लेखही शहांनी केला. राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम भाजप करत आले आहे. विरोधकांनी मात्र आतापर्यंत खोटे पसरवण्याचे काम केले. मोदी सरकारमध्ये दुधाची पावडर काधीही आयात केली नाही, तरीही जुने नोटिफिकेशन व्हायरल करण्यात येत असल्याचे शहांनी सांगिततले.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे बोलून जनतेत भ्रम निर्माण केला. आताही ते भ्रम पसरवूनच निवडणूक जिंकू पाहात आहेत. आमच्यावर भ्रष्टाचाराचे वारंवार आरोप केले जातात. मात्र देशात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार कोण असतील तर ते शरद पवार आहेत. त्याबाबत माझ्या मनात तीळमात्रही शंका नसल्याची टीका अमित शहांनी केली.

अमित शहांनी आपल्या संपूर्ण भाषणातील बराच वेळ शरद पवार Sharad Pawar यांच्यावर टीका करण्यात घालवला. तसेच मी बनिया असून महायुतीला जिंकवून आणण्याचा शब्द घेऊनच शाह यांनी आपले भाषण थांबले. यामुळे भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. आता अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार गट काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT