Amit Shah Vs Sharad Pawar : कोणताही चौक निवडा, मोहोळ हिशेब घेऊन येतील; शहांचं पवारांना ओपन चॅलेंज!

Murlidhar Mohol : पुण्यात आलेल्या अमित शहांनी देशातील यूपीए आणि एनडीए सरकारने महाराष्ट्राला किती निधी दिला याची आकडेवारी सांगितली.
Sharad Pawar, Murlidhar Mohol Amit Shah
Sharad Pawar, Murlidhar Mohol Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पुण्यात अधिवेशन झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांचा अमित शहा यांनी केलेला उल्लेख पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे पीछेहाट झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

या अधिवेशनाला राज्यभरातून पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित लावली होती. या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले.

अमित शहा Amit Shah म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा शरद पवारांमुळेच प्रलंबित राहिला. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळते, मात्र शरद पवारांचे सरकार आल्यानंतर हे आरक्षण गायब होते. आता राज्यात भाजपचे सरकार असून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू आहेत. पुढे शरद पवारांचे सरकार आले तर आरक्षण पुन्हा गायब होईल, अशी टीका शहांनी केली.

Sharad Pawar, Murlidhar Mohol Amit Shah
Amit Shah on Sharad Pawar : शरद पवार, शरद पवार अन्‌ शरद पवार....अमित शहांकडून 38 मिनिटांच्या भाषणात 10 मिनिटे पवारांचा जप...

शरद पवार ज्या विकासावर बोलतात त्याबाबत मी त्यांना प्रश्न विचारायला पुण्यात आलो आहे. दहा वर्षे केंद्रात आणि राज्यांमध्ये शरद पवार यांचे सरकार होते. त्या काळात शरद पवार यांनी राज्याला काय दिले? असा खडा सवालच शहांनी पवारांना केला आहे.

आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला केंद्राकडून एक लाख 91 हजार करोड निधी मिळाला होता. मोदी यांच्या दहा वर्षांत महाराष्ट्राला दहा लाख पाच हजार करोड इतका निधी दिला आहे. या आकडेवारीवर शरद पवारांना विश्वास नसेल तर पुण्यातील कोणताही चौक निवडा, आमचे मुरलीधर मोहोळ हे हिशेब घेऊन उभे राहतील, असे आव्हानच शहांनी शरद पवारांना दिले.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Murlidhar Mohol Amit Shah
Amit Shah Vs Sharad Pawar : मराठा आरक्षणावरून अमित शहांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com