Narendra Modi Meets Shivajirao Adhalrao Patil In Pune Sarkarnama
पुणे

Narendra Modi In Pune : शिरुर लोकसभेचा प्रश्न मिटला ? दहा वर्षानंतर पुन्हा मोदींच्या हातात आढळरावांचा हात

Narendra Modi Meets Shivajirao Adhalrao Patil : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये शिरूरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू

सरकारनामा ब्यूरो

Pune News : लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीसाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभसंकेत दिल्याचे सांगून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरच्या उमेदवारीरून महायुतीत निर्माण झालेला प्रश्न मिटल्याचेच सांगितले आहे. लोहगाव विमानतळावर स्वागत करताना मोदींनी आढळराव पाटलांनी काही वेळ चर्चा करून हातात हात घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Latest Political News)

पंतप्रधान मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. यानिमित्त माजी खासदार आढळराव यांना सकाळी लवकर विशेष निमंत्रितांच्या यादीत समावेश करीत असल्याचा मेसज देण्यात आला. लोहगाव विमानतळावर मोदी उतरल्याबरोबर त्यांचे स्वागत करणारांमधील मान्यवरांत आढळरावांचा समावेश होता. याबाबत आढळराव म्हणाले, "विमानातून उतरताच एकेके करुन मोदी प्रत्येकांशी हस्तांदोलन करत होते. मात्र जवळ येताच मोदींनी माझी हातात हात घेवून आवर्जून विचारपूस केली. शिरुर लोकसभा मतदारसंघात मी सध्या कसा सक्रीय आहे याची माहिती घेतली."

Narendra Modi Meets Shivajirao Adhalrao Patil In Ahebadabad 2013

या भेटीमुळे दहा वर्षांपूर्वी मोदी-आढळराव यांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सन २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१३ मध्ये शिरुरचे तत्कालीन खासदार आढळराव यांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी अहमदाबाद येथे बोलावून घेतले होते. त्यावेळी राजकीय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या मतदारसंघ शिरुरची चर्चा केली होती.

पुढील काळात आढळराव शिरुरचे खासदार म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेत गेले होते. त्याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती व्हावी असाच काहीसा प्रसंग पुण्यात मंगळवारी (ता. १) घडला. मोदींनी आवर्जून आढळरावांची भेट घेऊन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिरुरची माहिती घेतली. अर्थात हा आपला लोकसभा २०२३ साठीचा पुन्हा एकदा शुभसंकेत असल्याचेच आढळरावांनी आवर्जून सांगितले.

सन २०१३ मधील भेटीवेळी आढळराव हे उद्योगपती असल्याची चर्चा झाली होती. त्याला अनुसरुनही मोदींनी पुन्हा दोघांमधील जुन्या चर्चांना थोडक्यात उजाळा दिल्याचेही आढळरावांनी आवर्जून सांगितले. "या भेटीनंतर तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा थेट नरेंद्र मोदींचाच हातात-हात आल्याने माझ्यासाठी हा लोकसभा निवडणुकीसाठी शुभसंकेत आहे", असे आढळरावांनी स्पष्टच बोलून दाखविले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT