Pune News, 18 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांनी जेलमध्ये जो 100 दिवसांचा काळ व्यथील केला. त्या शंभर दिवसांच्या अनुभवांच्या आधारे संजय राऊतांनी 'नरकातील स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकांमधून राऊतांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
त्यामुळे सध्या या पुस्तकाची राजकीय वर्तुळा जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते या पुस्तकावरून राऊतांवर टीका करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते राऊचांचं समर्थन करत आहेत. अशातच आता या पुस्तकावर पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरकातील स्वर्ग या पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमाला पुण्यातून वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली होती. .या कार्यक्रमानंतर वसंत मोरे यांनी या पुस्तकाची एक प्रत आणली आहे. ही प्रत त्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं आपण पारायण करणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
तसंच पुण्यातील इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून देखील या पुस्तकाचं पारायण करून घेणार असल्याचं त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितलं. वसंत मोरे म्हणाले, संजय राऊत यांच्यासोबत पुस्तक प्रकाशापूर्वी झालेल्या एका भेटीदरम्यान त्यांनी मला सांगितलं होतं की, हे पुस्तक विरोधात राहून ज्यांना यशस्वी राजकारण करायचं आहे. त्यांच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहेत.
मी पुणे महापालिकेमध्ये 2007, 2014 आणि 2017 साली निवडणूक जिंकून विरोधी पक्षातच राहिलो आहे. मी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम केलं आहे. त्यामुळे माझं राजकारण हे विरोधी बाकावरती बसूनच यशस्वी झालं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातील स्वर्ग हे पुस्तक मी घेऊन आलो असून ते घरातील माझ्या देव्हाऱ्यात ठेवलं आहे.
हे पुस्तक माझ्यासाठी विरोधी पक्षात राहून यशस्वी राजकारण करण्याच्या दृष्टिकोने मार्गदर्शक ठरणार आहे. राऊत हे ज्या पद्धतीने विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी बिनधास्तपणे वावरत असतात. त्याच पद्धतीने पुण्यात देखील मी लोकांची कामे करताना कोणताही राजकीय विचार मनात न आणता बिनधास्तपणे वावरत असतो.
त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे. शिवाय आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संजय राऊतांनी लिहिलेल्या पुस्तकाचं मी पारायण सर्व शिवसैनिकांकडून करून घेणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.