Pune Porsche Accident : पुण्यातील 'पोर्शे' कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी थेट न्यायालयाला पत्र पाठवत केली 'ही' महत्त्वाची मागणी

Pune Porsche Hit-and-Run Case : पोर्शे अपघात प्रकरणातील सर्व म्हणजे दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप निश्चितीसाठीचा मसुदाही सरकारी वकिलांनी दाखल केला आहे. मात्र, आरोपींच्या पक्षाकडून जामीनासह निर्दोष मुक्ततेसाठीच्या केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला वेळ लागत आहे.
Porsche Car Accident Case
Porsche Car Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 18 May : पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवावा अशी मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयात केली आहे.

यासाठी पोलिसांनी न्यायालयात पत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात प्रकरणी अल्पवयीन कार चालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

Porsche Car Accident Case
Nashik News : रक्षकच बनला भक्षक, पतीला ठार करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलिसाला अटक

याच प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलत या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्या प्रकरणी आरोपी विरोधात सुरू असलेला खटला जलदगतीने चालवावा, अशी विनंती पुणे पोलिसांनी जिल्हा न्यायालयकडे केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केल्यास लवकरच या अपघात प्रकरण निकाली निघू शकते.

पोर्श अपघात प्रकरणातील सर्व म्हणजे दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप निश्चितीसाठीचा मसुदाही सरकारी वकिलांनी दाखल केला आहे. मात्र, आरोपींच्या पक्षाकडून जामीनासह निर्दोष मुक्ततेसाठीच्या केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला वेळ लागत आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे हा तपास जलदगतीने व्हावा अशी विनंती केल्यामुळे या खटल्याच्या सुनावनीला वेग येऊ शकतो.

Porsche Car Accident Case
Top 10 News: 'स्वर्गातील नरक’वरून राजकारण तापलं, ईडीबाबत शरद पवारांचा इशारा ठरतोय खरा, 'संतोष देशमुख पार्ट-2 करणार...

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं पोर्शे गाडीने दोन आयटी अभियंत्यांना चिरडलं होतं. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा असं मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं.

त्यानंतर आरोपीला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. या मंडळाने आरोपीला केवळ 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन जामीन मंजूर केला होता. ही शिक्षा आणि जामीन चांगलाच वादात सापडला. त्यानंतर प्रकरणातील आमदार कनेक्शन समोर आल्यामुळे यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. तर दुसरीकडे अल्पवयीन कारचालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच वादग्रस्त ठरलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com