पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे घडलेली ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे. 65 वर्षांच्या एका व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. लोकांकडून कठोर शिक्षेची मागणी होत असताना, आरोपीच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्याच्याविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या पत्नी आणि मुलानेच त्याला नाकारले आहे. पत्नीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून तिचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. तिने संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “त्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. माझ्यापर्यंत कुणी त्याचा अंत्यविधी झालाय वगैरे सांगायलाही येऊ नये. गेल्या १० वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाहीये. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी”.
“फक्त फाशी नाही, ठेचला पाहिजे त्याला. जिवंत जाळला पाहिजे त्याला. तरीही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही. त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय त्यामुळे आम्हाला लोक जे काही बोलतील ते ऐकून घ्यावं लागेल”, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मुलाचीदेखील प्रतिक्रिया तितकीच संतापजनक आणि वेदनादायक होती. त्याने सांगितले की, अशा व्यक्तीला बाप म्हणवून घेण्याचीही लाज वाटते. “मला तो माझा बाप म्हणून घ्यायचीही लाज वाटतेय. त्या चिमुकलीबाबत त्यानं अमानुष कृत्य केलं आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारला पाहिजे.
त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. मला ती माझ्या भाचीसारखीच आहे. मला ११ भाचा-भाची आहेत. मला या घटनेनंतर खूप वाईट वाटलंय. त्याला मारला पाहिजे. आम्हाला यात खूप मानसिक त्रास होतोय. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहातो. न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढला पाहिजे असं आपण केलं पाहिजे”.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.