Ajit Pawar-Yugendra Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati-Video : बारामतीत 'काका' विरुद्ध 'पुतण्या'मध्ये लढाई; युगेंद्र पवारांना 'तुतारी'ची उमेदवारी

Baramati Assembly Election: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ४५ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली. त्याचबरोबर बारामतीत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 24 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज (ता. 24 ऑक्टोबर) सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. या यादीत बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीत पाहायला मिळणार आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ४५ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली. त्यात जयंत पाटील, शशिकांत शिंदे, महेश कोठे, नारायण पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, रोहित पाटील, गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे या प्रमुख उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर बारामतीत युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, बारामतीत अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून त्यांच्या नावाची बारामतीत चर्चा सुरू होती. पक्ष जो जबाबदारी देईल, ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी आहे, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले होते.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा सामना त्यांचे सख्खे काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतही पवार घराण्यातच लढाई झाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT