Narhari Zirwal : अजित पवार पक्षाचे झिरवाळ यांचा अजब दावा; `शरद पवारांचे मला आशीर्वाद`

Narhari Zirwal Submits Nomination for Election: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Dhanraj Mahale & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar: दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे अनिश्चित आहे. त्यामुळे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवार कोण? याची उत्सुकता वाढली आहे. या मतदारसंघात बंडखोरीचे लोन पसरण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे उमेदवार म्हणून आमदार झिरवाळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार झिरवाळ यांना गेल्या निवडणुकीत साथ केलेले किती नेते त्यांच्याबरोबर असतील याविषयी मोठे प्रश्नचिन्ह आहे.

अशा स्थितीत आमदार झिरवाळ यांना महायुतीतूनच बंडखोरांचे आव्हान आहे. त्यामुळे झिरवाळ यांची यंदाच्या निवडणुकीतील स्ट्रॅटेजी काय असणार? हा त्यांच्या समर्थकांसाठीही उत्सुकतेचा विषय आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार झिरवाळ यांनी आज एक अजब दावा केला. ते म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या बळावर उमेदवारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असले तरीही मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दुरून आशीर्वाद असतील.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Nashik Central Constituency: `नाशिक मध्य`ची उमेदवारी ठाकरे पक्षाला; नाराज काँग्रेस 'सांगली' पॅटर्नच्या तयारीत!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे काही पदाधिकारी आणि नेत्यांसह आमदार झिरवाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार झिरवाळ सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत आमदार झिरवाळ यांचा पराभव करणारच असा निर्धार माजी आमदार महाले यांचा आहे. त्यामुळे आमदार झिरवाळ यांना यंदा महायुतीतूनच मोठे आव्हान आहे. ही बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेले नाही.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Manikrao Kokate Politics: आमदार कोकाटे म्हणतात, "मला निवडणुकीत प्रतिस्पर्धीच नाही"

यंदाची निवडणूक अतिशय रंजक होण्याची चिन्हे आहेत. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. पाच इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीसाठी रांगेत आहेत.

महाविकास आघाडीला सुद्धा उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. आपण शंभर टक्के विजय होऊ, असा त्यांचा दावा आहे. तो कितपत खरा ठरतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com