Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : "कुणी कुठे लाइन मारायला गेला तर टायरखाली..." मुलींची छेड काढणाऱ्यांवर अजितदादा संतापले

Ajit Pawar warns against crime in Baramati : स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून कडक भूमिका घेतली आहे. कामानिमित्त बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने बारामतीची बदनामी होत असल्याचं अजितदादा म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News, 16 Aug : स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून कडक भूमिका घेतली आहे. कामानिमित्त बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने बारामतीची बदनामी होत आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा दम अजितदादांनी दिला आहे.

बारामतीमधील एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं कामासाठी बारामतीत येतात. मात्र, तिकडून आलेल्या एकाने आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. ती मुलगी देखील उत्तर प्रदेशची आहे. मात्र शेवटी बदनामी बारामतीची होते. अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका.

त्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा. त्याच्यावर अशी कारवाई झाली पाहिजे की पुन्हा अशी काही करायची कोणाचीच हिम्मत झाली नाही पाहिजे. तसंच आपल्या मुला-मुलींना चांगली शिकवण द्या कुठेही वेडे वाकडे प्रकार त्यांनी केले नाही पाहिजेत. मी स्वातंत्र्य दिना दिवशी सांगत आहे की कोणाचीही दहशत मी खपून घेणार नाही.

"कुणी कुठेतरी लाइन मारायला गेला तर तुझी लाइनच काढतो आणि टायरखाली घेतो. अजिबात कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाने कायदा हातात घेऊ नये," असा दमच अजितदादांनी यावेळी भरला आहे. काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. विकास कामांना अडथळा चढणारी अतिक्रमण काढावी लागतात पिंपरी-चिंचवड येथे विकास करताना मला अनेकदा अतिक्रमणे काढावी लागली.

कुणाच्या पोटावर पाय आणावा, अशी भावना माझी नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करायचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी बारामतीमधील बॅनरबाजीवरून प्रशासनाला महत्वाच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, "बारामतीमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावले तरी ते तातडीने काढून टाका त्याची सुरुवात माझ्या पोस्टर पासून करा.

कुणाचे लाड ठेऊ नका. लावायचे आहेत त्यांनी अधिकृत ठिकाणी पोस्टर लावावे. आपले शहर बॅनर लाऊन विद्रूप करू नका." बारामती शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली रहावी कोणती दादागिरी या ठिकाणी असू नये सर्वांनी शिस्तीचे पालन केलं पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असला तरी शिस्तही पाळलीच पाहिजे.

मला एकाने फोटो पाठवले की कुणीतरी अचानक ऑफिस उघडले. तुम्ही ऑफिस कुठे काढत आहात ती जागा तुमच्या घरची आहे का? ही बारामतीकरांची जागा आहे. असं कुठेही तुम्ही ऑफिस कसं काढू शकता आणि हे घडत असताना अधिकारी गप्प कसे काय बसतात? उद्या अजित पवारच्या उजव्या हात वाल्याने जरी ऑफिस टाकले तरी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला करायला मागे पुढे बघायचे नाही, असं म्हणत कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थितच राहिली पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT