Mumbai Rain | Vikhroli Parksite Landslide : मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून हवामान खात्याने आज देखील मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
अशातच आता रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ भागातील दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेकजण जखमी झाले आहेत. ऐन दहीहंडीच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
विक्रोळीतील पार्कसाईट हा डोंगराळ भाग असून या परिसरात डोंगरावर अनेक घरे आहेत. तर डोंगराळ भागामुळे इथे ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. अशातच आज पहाटे रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ज्यामध्ये मिश्रा कुटुंबियांचं घर दरडीखाली गाडलं गेलं.
यामध्ये सुरेश मिश्रा (वय 50) आणि शालू मिश्रा ( वय 19) या बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज दिवसभर पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.