BEST Patpedhi election : राज-उद्धव एकत्रित लढवत असलेल्या 'बेस्ट'च्या संचालकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी; ठाकरेंची कोंडी करण्याचा प्लॅन? चर्चांना उधाण

BEST Patpedhi election Mumbai : ठाकरे बंधू अनेक दिवसांनी एकत्र आले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्रितपणे बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवणार आहेत. बेस्टची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Aug : राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू अनेक दिवसांनी एकत्र आले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्रितपणे बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवणार आहेत.

बेस्टची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या पतपेढीच्या संचालक मंडळाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आर्थिक गुन्हे शाखेच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आला आहे.

कारण बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र आलेत. शिवाय या पतपेढीवर मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकीला दोन दिवस उरले असताना आणि ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असताना पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या चौकशीमागे काही राजकारण आहे का? हा ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Mumbai Rain Landslide : मुंबईतील विक्रोळीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, झोपेतच बाप-लेकीवर काळाचा घाला

नेमका आरोप काय

बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची 12 कोटी 40 लाखांना फसवणूक झाल्याचा आरोप काही सभासदांनी केला आहे. लोणावळा येथील विश्रामगृह जास्तीचे पैसे देऊन खरेदी केल्याचा आरोप संचालकांवर होत आहे. विश्रामगृहाची किंमत 5.63 कोटी ठरवली असताना ते 18 कोटीला विकत घेतल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत सभासदाने तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने संचालक मंडळाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्र लढणार आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
BMC Election 2025: सत्तेच्या दहीहंडीसाठी शक्तिप्रदर्शन; लाखोंच्या हंड्यांतून मतदारांच्या मनाची हंडी कोण जिंकणार?

तर ठाकरेंच्या पॅनलविरोधात भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे. तर दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित निवडणूक लढवत असल्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com