Manchar Nagar Panchayat election 2025 sarkarnama
पुणे

Ajit Pawar: भरसभेत अजितदादा महिला उमेदवाराला म्हणाले, लव्ह मॅरेज झाले आहे का?

Manchar Nagar Panchayat Election 2025: आपल्या रोखठोक विधानासाठी अजित पवार सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या अशा बोलण्याने कधी ते अडचणीत येत असतात. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची मंचरमध्ये सभा आयोजित केली होती.

Mangesh Mahale

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचरमध्ये एकमेकांचे विरोधक म्हणून उभे ठाकले आहेत. मंचर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी अजित पवार यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले आहे, त्यामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी यांचा सामना महायुतीतील तिसरा घटक पक्ष शिवसेना यांच्याशी आहे.

आपल्या रोखठोक विधानासाठी अजित पवार सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या अशा बोलण्याने कधी ते अडचणीत येत असतात. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची मंचरमध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी अजित पवार यांनी टोलेबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.

आज भाषणात अजितदादांनी केलेल्या विधानाची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. त्यांनी भरसभेत महिला उमेदवारांला विचारलेला एक प्रश्न चर्चेचा ठरला. मंचर नगर पंचायतीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी मोनिका बाणखेले या उमेदवार आहेत.

भाषण करीत असताताना अजित पवार यांनी त्यांचे नाव वाचले. त्यानंतर अजितदादांनी त्यांना लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अजितदादांनी लगेचच स्पष्टीकरण दिले. 'सासर आणि माहेर एकाच गावात आहे, म्हणून हा प्रश्न विचारल्याचे दादांनी सांगितले.

काय म्हणाले अजित पवार...

अजित पवार: मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले पुर्वीच्या मोनिका बेंड, हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे, मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे, बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय?

सासर माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.

अजितदादांनी प्रदीप कंदांना काढला चिमटा

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यांना चिमटा काढण्याची संधी अजितदादांना सोडली नाही. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपले भाषण संपल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील. कार्यक्रम पत्रिकेनुसार अजित पवार यांच्या भाषणाची वेळ होते. पण त्यावर लगेचच अजितदादांनी भाजप जिल्ह्याध्यक्ष प्रदीप कंद यांना भाषण करण्याची संधी द्या, असे वळसे पाटलांनी सांगितले. प्रदीप कंद यांची ओळख पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे अन् आत्ता भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी ओळख करुन द्यायला लावली, वळसे पाटलांनी मग अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे कंद यांची ओळख करुन दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT