Kolhapur Politics: समरजीत मुख्यमंत्र्यांचे लाडके, पण एकनाथ शिंदेंचे नेते दृष्ट लावतात; मुश्रीफांची टोलेबाजी

Hasan Mushrif on Kagal Election 2025: काही मंडळींना आम्ही दोघे एकत्र आलो याचं काय वाईट वाटतंय हेच कळेना झालंय? अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय आता त्यांना कसलं औषध द्यायचं हेच कळेना. एकनाथ शिंदे यांचे खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात बरंच काही काही आमच्याबद्दल बोलले.
Kolhapur Politics News
Kolhapur Politics News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक यांनी आरोपांचा सपाटाच सुरू केला आहे.

कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचे वातावरण तंग झाले असताना आता मंत्री असं हसन मुश्रीफ यांनी देखील या आरोपांना प्रतिउत्तर देत टोलेबाजी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांचा लाडका कोण? यावरून बोलत असताना खासदार धैर्यशील माने यांच्यासह मंडलिक यांना देखील खडेबोल सुनावले आहेत.

काही मंडळींना आम्ही दोघे एकत्र आलो याचं काय वाईट वाटतंय हेच कळेना झालंय? अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय आता त्यांना कसलं औषध द्यायचं हेच कळेना.

काल एकनाथ शिंदे यांचे खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात बरंच काही काही आमच्याबद्दल बोलले. पण मी त्यांना म्हणतोय की कशाबद्दल आम्हाला तुम्ही दृष्ट लावत आहे. त्यांनी आम्हाला दृष्ट लावली तर लावू दे तुम्ही मात्र आम्हाला काजळ लावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

Kolhapur Politics News
Nandurbar Election 2025: उमेदवाराचा अनोखा फंडा! शहराच्या विकासासाठी पठ्ठानं स्टॅम्प पेपरवरच दिली गॅरंटी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदाराने आम्हाला दृष्ट लावली जनता आम्हाला काजळ लावेल, असे म्हणत मंत्री मुश्रीफ यांनी समरजीत सिंह घाटगे हे मुख्यमंत्र्यांचे आवडते आहेत. मुख्यमंत्री त्यांचे गुरु आहेत. मी मुख्यमंत्र्यांचा नावडता आहे असं नाही. पण माझ्यापेक्षा समरजीत सिंह घाटगे हे मुख्यमंत्र्यांचे जास्त आवडते आहेत.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी विचार केलाच असेल म्हणून तर आमची युती झाली. आमच्या कागल तालुक्याला नैसर्गिकरित्या राजकीय वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील बाकीच्या नेत्यांपेक्षा जास्त धमक आमच्याकडे आहे. म्हणून आमच्याकडे नेतृत्व आलेलं आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.