Manchar Election : वळसे पाटील, आढळरावांविरोधात शिष्यांचाच शड्डू : बाणखेले, गांजाळेंनी जुळवली समीकरणं

Manchar Election : मंचर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत वळसे पाटील आणि आढळरावांविरोधात शिष्यांनी बंड पुकारले. बाणखेले–गांजळे गट एकत्र आल्याने १६ जागांसाठी ६७ उमेदवारांची निवडणूक रंगतदार बनली आहे.
Dilip Walse Patil, Shivajirao Adhalrao Patil
Dilip Walse Patil, Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Manchar News : मंचर नगरपंचायतीची प्रथमच निवडणूक होत आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले सध्या गळ्यात गळा घालून फिरत आहेत, तर एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करणारे एकमेकांवर हातवारे करत आहेत. हे वेगळेपण या निवडणुकीत पहावयास मिळत आहे. महायुती व महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. या निवडणुकीसाठी १६ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार आहे.

मंचर ग्रामपंचायत यापूर्वी झालेल्या निवडणुकीसाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अटीतटीच लढती झाल्या होत्या. यावेळी हे दोन नेते एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे. पण या दोन्ही नेत्यांचे शिष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, मंचरचे माजी सरपंच शिवसेनेचे दत्ता गांजाळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांनी दंड थोपटले आहेत.

शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यायुतीचे नेतृत्व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व भाजपचे नेते प्रमोद बाणखेले, काँग्रेस व आप युतीचे नेतृत्व राजू इनामदार करत आहेत. मोनिका बाणखेले (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री गांजाळे (शिवसेना), रजनीगंधा बाणखेले (ठाकरे शिवसेना), फर्जीन मुलाणी (काँग्रेस), प्राची थोरात (अपक्ष) व जागृती महाजन (अपक्ष) नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत.

Dilip Walse Patil, Shivajirao Adhalrao Patil
Manchar NCP News : मंचरच्या मेळाव्यात अतुल बेनकेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, दादांना शपथविधीसाठी...

माजी खासदार दिवंगत किसनराव बाणखेले यांची सून वंदना यांची प्रभाग एकमधून बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेली दोन वर्षे तयारी करणारे भाजपचे संजय थोरात यांची सून प्राची यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने थोरात व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Dilip Walse Patil, Shivajirao Adhalrao Patil
Pune ZP Reservation : वळसे पाटलांचे पुतणे, हर्षवर्धन पाटलांची कन्या पुन्हा दिसणार झेडपीत; बुट्टे पाटील, देवकाते, लांडेंना धक्का!

वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी १३५ कोटी रुपये निधी आला. अनेक विकासकामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून उताराने १३६ कोटी रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना राबविण्याचा व २४ तास मंचरकरांना पाणी मिळेल. असा प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने केला आहे.

नगर विकास खाते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिवसेनेने यापूर्वी मंचरसाठी केलेले काम सर्वांसमोर आहे. तसेच शिवसेनेला संधी मिळाल्यास भष्ट्राचारमुक्त काम करू असा प्रचार शिवसेनेने सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यापूर्वी मंचर ग्रामपंचायतीत झालेला गैरव्यवहार व यापुढे पारदर्शक कामकाज उच्च शिक्षित तरुणींच्या हातात नगरपंचायतीची सूत्र व स्वाभिमानी मंचर या मुद्द्यावर भर दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com