Chandrakant Bagal sarkarnama
पुणे

Gun Case : पुणे विमानतळावर मोठा राडा! राष्ट्रवादीचा नेता रिव्हॉल्वर घेऊन वाराणसीला निघाला, नेमकं काय घडलं?

NCP Police Chandrakant Bagal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विमानतळावर नेत्याच्या साहित्यात बंदूक आढळली होती.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे विमानतळावरून वाराणसीला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या बॅगेमध्ये रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. या नेत्याचे नाव चंद्रकांत प्रभाकर बागल (वय 63, गादेगाव) असे आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहेत. तसेच 2014 ची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी लढली होती. पोलिसांनी रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विमानतळावर सुरक्षा तपासणीवेळी बागल यांच्या सामानातून भारतीय बनावटीचे रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस सापडले. सीआयएसएफ आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन विमाननगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चौकशीत समोर आले की, बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे परंतु तो फक्त महाराष्ट्रात वैध आहे. वाराणसीला प्रवास करताना त्यांनी आवश्यक परवानगी न घेतल्याने नियमांचा भंग झाला. याप्रकरणी त्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले असून चौकशीसाठी नोटीस देऊन त्यांना पुढील प्रवासाची परवानगी देण्यात आली.

वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले, की संबंधित व्यक्तीला सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले होते. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिले. त्यांनी सरकारने आखून दिलेल्या शस्त्र परवाना नियमावलीचे व अटी-शर्तीचे उल्लन्घन केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कुटुंबीय व अन्य लोकांसोबत वाराणसी येथे निघालेले होते. त्यांना चौकशीसंबंधी नोटीस दिली असून पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. ते वाराणसी येथे गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT