India vs Pakistan Match : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भरमैदानात फरहानची गोळीबाराची अ‍ॅक्शन; संजय राऊत संतापले, 'मोदी सरकारसाठी लज्जास्पद...'

Sanjay Raut Narendra Modi : पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान याने बॅटीने गोळ्या चालण्याची अ‍ॅक्शन केल्यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत मोदी सरकावर टीका केली आहे.
jay Raut slams Modi government and BCCI over Sahibzada Farhan’s controversial celebration in India-Pakistan match.
jay Raut slams Modi government and BCCI over Sahibzada Farhan’s controversial celebration in India-Pakistan match.sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : आशिष चषकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी रात्री झाला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान याने त्याच्या अर्धशतकानंतर मैदानात बॅटने गोळ्या चालवण्याची अॅक्शन करत सेलीब्रेशन केले. या मॅचमध्ये पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. मात्र, फहानच्या सेलिब्रेशनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत संताप व्यक्त करताना बीसीसीआय, पंतप्रधान मोदींवर टीका केली.

राऊत म्हणाले, 'भारत-पाकिस्तान सामन्यात साहेबजादा फरहान याचे अर्धशतक लागताच मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची अॅक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. ही कृती म्हणजे बीसीसीआय आणि मोदी सरकारसाी लज्जास्पद बाब आहे.'

'साहिबजादा फरहान यांने गोळीबाराची अ‍ॅक्शन करत मैदानावर दाखवून दिले की पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 निष्पापांची कत्तल कशी केली. ते काहीच नसल्यासारखे त्यांना गोळ्या घालून ठार मारले. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत.' असा संताप देखील राऊत यांनी व्यक्त केला.

jay Raut slams Modi government and BCCI over Sahibzada Farhan’s controversial celebration in India-Pakistan match.
Laxman Hake Controversy : लक्ष्मण हाकेंनी वाढवलं टेन्शन, म्हणाले, ओबीसीतील 'या' जातींना एससीतून आरक्षण द्या!

पाकिस्तानसोबत खेळण्याविषयी पुर्नविचार करावा

रोहित पवार यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे की, पहलगाममध्ये २७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकसोबत क्रिकेट खेळण्यास भारतातील बहुतेक क्रिकेट प्रेमींचा विरोध असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने ने घेतला, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हेच पाकने आज दाखवून दिलं. त्यांचा मस्तवाल खेळाडू साहिबजादा फरहान याने एके-४७ प्रमाणे बॅट दाखवत ज्या खेळातून परस्परांप्रती विश्वासाची भावना निर्माण व्हावी त्याच खेळातून द्वेष आणि शत्रूत्त्वाची पेरणी केली. ही अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह बाब आहे. असं असेल तर आतातरी या वाकड्या शेपटाच्या देशासोबत खेळण्याबाबत बीसीसीआय ने पुनर्विचार करावा.

भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध

आशिष चषक सुरू होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाकडून भारत-पाकिस्तान क्रिकेड सामन्याला विरोध केला होता. ज्या देशाने दहशतवादी हल्ला केला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नका, असे राऊत म्हणाले होते. ठाकरेंच्या पक्षाकडून बीसीसीआय आणि मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते.

jay Raut slams Modi government and BCCI over Sahibzada Farhan’s controversial celebration in India-Pakistan match.
Maharashtra Government : एकनाथ शिंदेंच्या माजी आमदाराला 20 कोटींची खिरापत; ही कबुली फडणवीस, अजितदादांना गोत्यात आणणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com