Anjali Damania Vs Rohit Pawar : मोठा धमाका होणार! आठवडाभर थांबा; रोहित पवार, सुषमा अंधारेंना अंजली दमानियांचा सूचक इशारा

Anjali Damania Sushma Andhare : अंजली दमानिया या भाजप नेत्यांच्या घोटाळ्यावर मैन बाळगतात आणि पवार, ठाकरेंना टार्गेट करतात असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय त्याला दमानियांनी उत्तर दिले आहे.
Rohit Pawar Anjali Damania Sushma Andhare
Rohit Pawar Anjali Damania Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या भाजपला स्वाॅफ्ट काॅर्नर देतात, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी देखील दमानिया यांच्या हेतू बद्दल कुठलीही शंका नाही परंतु त्यांच्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत, असे म्हणत त्यांना तीन प्रश्न विचारले. ज्यात भाजपशी निगडीत त्यांच्या भ्रष्टाचार, घोटाळ्याबाबत घेतली नाही.

पवार, अंधारे यांच्या आरोपानंतर दमानिय यांनी 'सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी रोहित पवार, सुषमा अंधारे यांना विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.', असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आठवडाभरात दमानिया या मोठा घोटाळा बाहेर काढणार अशी चर्चा सुरू आहे.

तसेच दमानिया यांनी ट्विट करत, 'महाराष्ट्राच्या दोन विद्वान नेत्यांना माझे आदरपूर्वक उत्तर, असे म्हणत माझ्या कृतींबद्दलच्या त्यांच्या समजुतींबद्दल, किंवा माझ्या हेतूंबद्दलच्या त्यांच्या गृहीतकांबद्दल, त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही. जे योग्य आहे ते करण्याचे प्रयत्न करावे आणि पुढे जावे.', असे देखील म्हटले आहे. तसेच आणि हो, या दोन्ही नेत्यांनी कुठचाच विषय, ना कधी लावून धरला, ना कधी तडीस नेला, असा टोला देखील लगावला.

Rohit Pawar Anjali Damania Sushma Andhare
India vs Pakistan Match : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भरमैदानात फरहानची गोळीबाराची अ‍ॅक्शन; संजय राऊत संतापले, 'मोदी सरकारसाठी लज्जास्पद...'

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

अंजली दमानिया या व्यक्तिरेखे बद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं.चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही. पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. मात्र आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या... म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा.

रोहित पवार यांनी विचारले तीन प्रश्न

रोहित पवार यांनी तीन प्रश्न मांडत त्यावर अंजली दमानिया यांनी भूमिका मांडून गैरसमज दूर करावेत असे आवाहन केले आहे.

- राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी २० लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का?

- मेघा इंजिनिअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केलं म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ९५ कोटींचा दंड ठोठावून त्याचं साहित्य जप्त केलं, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ १७ लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का?

- सिडको ची ५००० कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे १२००० पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे.

या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत… अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे,

Rohit Pawar Anjali Damania Sushma Andhare
Laxman Hake Controversy : लक्ष्मण हाकेंनी वाढवलं टेन्शन, म्हणाले, ओबीसीतील 'या' जातींना एससीतून आरक्षण द्या!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com