Rupali Chakankar, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar News : साहेबांच्या वक्तव्यामुळे सुनांचा सासुरवास वाढला! रुपाली चाकणकर संतापल्या

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या विधानावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar News) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी केलेल्या वक्तव्याची भीती वाटायला लागली आहे. या वक्तव्यामुळे सासरी सुनांना होणाऱ्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे. जो त्रास सुनांना सासरी होतो, त्यामध्ये आता शरद पवारांनी केलेल्या वाक्याची भर पडणार आहे. त्यामुळे सुनांना होणाऱ्या त्रासात भर घालणारं, हे विधान होऊ शकतं.

कोल्हेंचे हास्य राक्षसी

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार जेव्हा हे वक्तव्य करत होते तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले लोक हसत असल्याचं पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या बाजूला खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बसले होते. अमोल कोल्हे एक कलाकार आहेत.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भूमिका त्यांनी मालिकेच्या माध्यमातून केलेली असताना साहेबांनी विधान केल्यावर राक्षसी हस्य करत अमोल कोल्हे यांनी दिलेली साथ ही निषेधार्य आहे. त्यामुळे  बाजूला बसलेल्या लोकांचा देखील निषेध करत असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यातल्या सुनांना आता प्रश्न पडत आहे. की आमचं घर कोणतं आहे? असं चाकणकर म्हणाल्या. तसेच आपल्या संसदरत्न खासदार ही मुलाखत बघितली नाही असं त्या म्हणत आहे. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. तुम्ही लग्नानंतर सासरी गेलाच नाहीत, त्यामुळे तुम्हला सासुरवाशीन सुनेचे दुःख कसे कळेल, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांच्या वर नाव घेता चाकणकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT