Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदे दरम्यान मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे विधान करीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar News) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
या विधानावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत सुनेत्रा पवार यांना काल प्रश्न विचारला असता त्या भावुक झाल्या तर आज त्यांनी या प्रश्नावर हात जोडले. ही निवडणूक वैचारिक असून नात्यातली नसल्याचे सांगितले आहे.
पुण्यामध्ये आज महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांनी मार्केट यार्ड परिसरामध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी या महायुतीच्या उमेदवारांनी संवाद साधला. "मतदार संघामध्ये फिरताना लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचा जाणवत आहे. प्रत्येक ठिकाणी आदरपूर्वक स्वागत करण्यात येत असून प्रचंड मोठा असा पाठिंबा आम्हाला मिळत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्रच पाणीटंचाई सुरू आहे. ही पाणीटंचाई कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नये म्हणून वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार," असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्ष अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली मात्र यंदाच्या निवडणुकीत स्वतःसाठी प्रचार करताना कोणत्या भावना आहेत. याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, गेल्या काही वर्षात अनेक उमेदवारांसाठी मी मतं मागितली. मात्र आता मी उमेदवार असल्याने वेगळी भावना आहे. उमेदवार म्हणून प्रचार करताना एक जबाबदारीची भावना मनामध्ये असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
विकासाच्या मुद्द्यावरून कौटुंबिक आणि वैयक्तिक मुद्द्यावरती ही निवडणूक आल्याचा पाहायला मिळत आहे, याबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या, निवडणूक वैचारिक मुद्द्यावरती आहे ही निवडणूक नात्यांची नाही हे मी पूर्वीपासून सांगत आलेले आहे. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असेल असे देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या. शरद पवार यांच्या वक्तव्यावर विचारला असता त्यांनी हात जोडत उत्तर देण्यात आला.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आसपासच्या भागातील शेतकरी मार्केटयार्ड येथील बाजारपेठेत माल विकण्यास दररोज येत असतो. त्या पार्श्वभूमीवर आज मार्केटमध्ये येऊन शेतकरी वर्गाशी संवाद साधत आहे. येत्या काळात शेतकरी वर्गासाठी विविध सोयीसुविधा निश्चित आणल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.