Sule Attack On Govt : गोळीबार सरकारच्या नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Salman Khan's house Front Firing : राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे. कोयता गॅंगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गॅंगची दहशत पुणे परिसरात कायम आहे.
Supriya Sule-Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Supriya Sule-Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune, 14 April : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर शनिवारी (ता. १३ एप्रिल) मध्यरात्री दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून यावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज (ता. १४ एप्रिल) सुप्रिया सुळे (Supriya Sule) ह्या पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेली गोळीबाराची घटना ही धक्कादायक होती. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule-Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Salman Khan: गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला फोन; सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना

राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे. कोयता गॅंगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गॅंगची दहशत पुणे परिसरात कायम आहे, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी सरकार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र डागले.

महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं असल्याची टीका सुळे यांनी केली.

Supriya Sule-Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Solapur Politics : पवार-शिंदे, मोहिते पाटलांमध्ये ‘शिवरत्न’वर खलबतं; धनाजी साठे, नारायण पाटलांचीही हजेरी

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार ह्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून शरद पवारांवर टीका होत आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेली साठ वर्षे आपण पाहत आलो आहे की शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. आपलं नाणं गेली साठ वर्ष खणखणीत आहे. त्यामुळे हेडलाईन व्हावी, यासाठीच पवार यांच्यावर टीका होत आहे, असं सांगून शरद पवार यांच्या विरोधात दररोज कटकारस्थान सुरू असतं, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

Supriya Sule-Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Madha Lok Sabha : ‘कालपर्यंत RSSचा प्रचार करणारे आज गांधीवादी कसे झाले?’ अभयसिंह जगतापांचा राष्ट्रवादीला खडा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com