Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी टोचले मोदी सरकारचे कान, म्हणाले, "केवळ…"

Sharad Pawar On Maratha OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन्ही समाजाचे नेतृत्व करणारे नेते आपापल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत.

Jagdish Patil

Pune News, June 20 : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन्ही समाजाचे नेतृत्व करणारे नेते आपापल्या मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. (Maratha and OBC Reservation)

अशातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. शिवाय सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. ते बारामती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेत बोलताना पवार (Sharad Pawar) यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "या सगळ्यावर एकच मार्ग आहे. तो म्हणजे केंद्र सरकारने याबाबत खुलासा केला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात तर काही ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला विशेषत: केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे.

सरकारने एका मर्यादेबाहेर हे आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची आपल्या सर्वांची जबाबादारी आहे. यात मी राजकारण आणू इच्छित नाही. पण केंद्राला केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे", अशी मागणी पवारांनी केली.

दुष्काळाची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार

दरम्यान, यावेळी त्यांनी बारामतीतील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. दुष्काळी भागाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं पवारांनी सांगितलं. तसंच या दुष्काळी दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यामुळे लोकांचे सुख दुःख जाणून घेण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा आम्ही असा दौरा करणार आहोत असल्याचंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT