K. P. Patil : कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का, माजी आमदार के.पी. पाटील अजितदादांची साथ सोडणार?

Kolhapur Politics, Ajit Pawar NCP K. P. Patil : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar, K P Patil
Ajit Pawar, K P PatilSarkarnama

Kolhapur News, 20 June : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूरातील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे महायुतीला राम राम ठोकणार असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे लोकसभेतील अपयश पचवून विधानसभेला नव्या जोमाने सामोरं जाण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) निवडणुकीपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात धक्का बसू शकतो. तर आगामी विधानसभेला युतीत थांबलो तर उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

कोल्हापुरात (Kolhapur) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. या पराभवानंतर युतीतीतल धुसफूस बाहेर आले. कोल्हापुरातील काही भाजप नेत्यांनी अजित पवार गटाने प्रामाणिकपणे काम केलं नसल्याचे आरोप केले होते. याला अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत आपण मंडलिक यांचं काम केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे युतीतील अंतर्गत वाद समोर आले होते.

Ajit Pawar, K P Patil
Girish Mahajan On Manoj Jarange : "जरांगेंचं समाधान होतच नाही", गिरीश महाजनांच्या विधानानं पेटणार नवा वाद?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी के.पी. पाटील यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर टीका करत त्यांना घरचा आहेर दिला होता. अशातच आता निवडणुकीपूर्वी के.पी. पाटील हे महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करतील असं बोललं जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील के.पी. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली तर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुतीसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. विद्यमान आमदार असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांना आमदारकी लढवायची असेल तर 'मविआ'शिवाय पर्याय नाही. या कारणामुळे ते मविआत जाऊ शकतात.

Ajit Pawar, K P Patil
Video Uddhav Thackeray : 'ते' पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी, भर मेळाव्यात बोलले...

दोन दिवसांपूर्वी आघाडीने कोल्हापुरात काढलेल्या मोर्चातही ते सहभागी झाले होते. शिवाय मंडलिक यांच्या विरोधात विजयी झालेले आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदावर शाहू महाराज हे आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात आले तेव्हा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले होते. या सर्व घटनांमुळे आता पाटलांची वाटचाल आघाडीच्या दिशेने सुरु असल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com