NCP Merger News: राज्यातील दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकमेकामध्ये विसर्जित करण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला चर्चेल शरद पवारांकडील नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र आहे तर अजित पवारांच्या गटातील लोक राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामुळं अजुनही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाचा मुद्दा पुढे सरकलेला नाही. त्यामुळं उलट संभ्रमाचंच वातावरण निर्माण झालेलं असताना यापार्श्वभूमीवर आता दोन्ही गटांतील सामान्य कार्यकर्तेच पुढे आले आहेत. विलिनिकरणासाठी जुन्नरमध्ये पहिलं पाऊल पडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी यासंदर्भात सांगितलं की, "आज आम्ही सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही सर्वांचीच भावना होती. आज जेव्हा सुनेत्रा पवार इकडं कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्रच राहणार आहोत आणि पुढेही एकत्रच वाटचाल करणार आहोत. याबैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष होते. तसंच जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण तालुका अध्यक्ष होते. तसंच दोन्ही प्रमुख नेते यावेळी होते, आम्ही सर्वांना सुनेत्रा पवारांना सांगितलं की, आम्ही आत्तापर्यंत महापालिकेत एकत्र लढलो होतो त्यानंतर झेडपीतही एकत्र लढलो त्यानंतर आता असंच एकत्र राहणार आहोत"
आमदार बेनके यांच्या या भूमिकेमुळं राज्यस्तरावर जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची किंवा विलिनीकरणाची केवळ चर्चाच सुरु असताना जुन्नर तालुक्यात मात्र दोन्हीकडंचे नेते आणि कार्यकर्ते हे आधीच एकत्र आलेले आहेत. त्यामुळं वरच्या स्तरावर या दोन्ही पक्षांबाबत काहीही निर्णय होवो जुन्नरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र एकत्र आलेत असा संदेश पक्षांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत जर वरिष्ठ पातळीवर विलिनिकरणाचा निर्णय झाला तर यामध्ये जुन्नरच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.