NCP Merger Pune Posters News Sarkarnama
पुणे

NCP NEWS: सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा! पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी

NCP Merger Pune Posters News: पोस्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. तसंच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असल्याचा देखील फोटो या पोस्टरमध्ये वापरण्यात आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेनंतर एक मोठा गट अस्वस्थ झाला आहे. या एकत्रीकरणाला विरोध करीत आहे. मात्र दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झाले आहेत, तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, असा अट्टाहास त्यांच्याकडून सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील डेक्कन चौकामध्ये लागलेले पोस्टर सध्या चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक येत्या बुधवारी होणार आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावर मुंबईत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. बैठकीत अनेक कार्यकर्ते आपली नाराजी व भावना थेट वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्याच्या तयारीत आहेत. विलीनीकरणामुळे दोन्हीकडून नाराजांचा एक मोठा गट समोर आला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपल्या हितसंबंधांना संभाव्य धोका लक्षात घेता पक्षातील सध्याचे असलेला आपलं महत्त्व कमी होण्याच्या भीतीमुळे काही नेते या एकत्रीकरणाचा प्रखरतेने विरोध करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अस्वस्थ मंडळीकडून आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे आपलं मत पोचवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मात्र या बैठकीपूर्वी डेक्कन चौकामध्ये लागलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे, या पोस्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. तसंच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असल्याचा देखील फोटो या पोस्टरमध्ये वापरण्यात आला आहे. हे पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून लावण्यात आले आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांच्याकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

या पोस्टरवर सुप्रिया ताई साहेबांची ईच्छा पूर्ण करा. साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमचावर सोडले आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, आपण सगळे जण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खुप आतुरतेने वाट पाहत आहे, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT