Uddhav Thackeray: ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय माजी नगरसेविकेचा राजीनामा; स्थानिक नेतृत्वावर नाराजी

Former Shiv Sena UBT corporator Tejasvi Ghosalkar-resignation: ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्तीय असलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे.

त्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : नाथाभाऊ, अरुण गुजराथी म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी शरद पवारांनी लवकर निर्णय घ्यावा!'

फेसबुक लाईव्ह सुरु असताना ठाकरेच्या शिवसेनेतील नेते अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती.अभिषेक घोसाळकर यांच्या तेजस्वी या पत्नी होत. त्या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत.

Uddhav Thackeray
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय? मोदींनी सांगितला अर्थ

तेजस्वी घोसाळकर यांना गेल्या महिन्यात व्हॉट्सअप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता.

काय म्हटलं आहे राजीनाम्यात...

मी तेजस्वी घोसाळकर महिला – दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती,असे तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

तेजस्वी यांनी आपला राजीनामा व्हॉट्सॲपद्वारे विभागप्रमुखांकडे पाठवला आहे. शिवसेनेचे मोठे नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. त्यांच्या राजीनाम्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com