Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय कुमार आहेर यांनी आमच्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी उघड नाराजी बोलून दाखवली आहे. एकप्रकारे त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असल्याचे दिसत आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय कुमार आहेर यांच्या उपस्थितीत राज्यातील मराठा प्रतिनिधींची आधार बैठक बैठक पार पडली. खरेतर शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार्यकर्ते असलेल्या उदय कुमार आहेर यांनी कार्यकर्त्यांसोबत काही वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात आपण पोरके पडलो असल्याची भावना उदय कुमार आहे यांनी व्यक्त केली आहे.
उदय कुमार आहेर म्हणाले, "आम्ही अजित पवार यांना पाहून पक्षात प्रवेश केला होता. परंतु, अजित पवार यांच्या निधनानंतर आम्ही पोरके झालो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागेल असे मराठा समाजाचा एकही नेता पक्ष कार्यालयात नाही. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 2 किंवा 3 वरिष्ठ पदावर मराठा समाजाचे नेते पक्ष कार्यालयात हवे आहेत.
सध्या कुठल्याही बाबीसाठी पक्ष आपल्याला विचारात घेत नसून सुनील तटकरे यांना वेळ मागितली. मात्र, त्यांच्याकडून वेळ देण्यात आली नाही. कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळण्याची अपेक्षा असते. पण, पक्षात ते मिळत नाही, असे उदय कुमार यांनी सांगितले. त्यामुळं या सर्व गोष्टी घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची वेळ घेऊन भेट घेणार आहे, अशी माहिती उदय कुमार आहेर यांनी दिली.
तसंच, आम्हाला जर सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर पक्षातील नेत्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आहेर यांनी तटकरे यांना दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बैठकीच्या बॅनरवरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रूपाली चाकणकर यांचा फोटो गायब झाल्याचे दिसले. बॅनरवर अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि कार्यकर्त्यांचा फोटो असल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.