Jitendra Awhad News : विधानसभेला पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या आई-वडिलांनी भोसरी मतदारसंघात मतदान केले होते. भोसरी मतदारसंघातील इंद्रायणी नगर येथे मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. इम्रान यांचे वडील महापालिका निवडणुकीसाठी युनूस शेख आणि आई राबिया या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मधून निवडणूक लढण्याची तयारी करत होते. मात्र, धक्कादायकरित्या त्यांचे नाव इंदापूर आणि शिरसुफळ- बारामतीच्या यादीत वर्ग करण्यात आले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी ट्विट केले आहे. युनूस शेख यांनी आपले नाव वर्ग करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. मात्र तरी देखील त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव इंदापूर आणि शिरसुफळ- बारामतीच्या यादीत वर्ग केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे,
आव्हाड म्हणाले, गेले 35 वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान करणाऱ्या या दाम्पत्याची नावे कोणताही अर्ज केलेला नसताना इथून हटवलीच कशी गेली? सर्वात विचित्र म्हणजे, नवरा इंदापूर आणि बायको बारामतीच्या मतदारयादीत दाखविण्याचा प्रताप निवडणूक आयोगाने केला आहे.
निवडणूक आयोग व्होटचोरी तर करतेच; आता चक्क मतदारांची पळवापळवी सुरू करण्यात आली आहे. असे जर असेल तर या लोकशाहीला काही अर्थ उरला आहे का? निवडणूक आयोग या प्रश्नाचे उत्तर देणारच नाही. पण, सत्ताधारी लगेचच उत्तरे द्यायला पुढे येतील, यातच सर्वकाही आले, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला आहे.
आव्हाड यांनी हे देखील सांगितले की, सुधीर भगत हे मुंब्र्याचे तीनवेळा नगरसेवक होते. त्याच्या वडिलांना ओळखत नाही, असे एकही घर मुंब्र्यात नाही. त्याच्या वडिलांच्या नावे "रामचंद्र नगर " नावाचे एक नगरच आहे. ते यंदा निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळेच या प्रबळ उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी - कर्मचारी यांना हाताशी धरून सुधीर भगत यांचे नाव मतदारयादीतून काढण्याची प्रक्रिया करण्यात आली अन् पकडली गेली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.