Ajit Pawar, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पुणे

NCP Split And Radhakrishna Vikhe Patil : ...म्हणूनच अजित पवार सरकारमध्ये; राधाकृष्ण विखेंनी सांगितलं कारण

डी. के. वळसे पाटील

Radhakrishna Vikhe On Ajit Pawar Rebel : मंचर : राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाली. यानंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याचे कारण खुद्द अजित पवार यांनी दिले आहे. आता याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही माहिती दिली. (Latest Political News)

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ८) शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे म्हणाले, "सध्या सुरू असलेला तिसऱ्या आघाडीचा प्रयोग देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजिबात रुचला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश व जागतिक पातळीवर करत असलेल्या चांगल्या कामाला पाठबळ मिळावे म्हणूनच अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत."

डिंभे धरणाला बोगदा पाडून नगर जिल्ह्यात पाणी नेण्यास वळसे पाटील, आढळराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यावर विखे पाटील म्हणाले, "कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही मी स्वागत करतो. डिंभे धरण बोगद्यातून नगर जिल्ह्याला पाणी देण्याबाबत आंबेगाव शिरूरच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. वळसे पाटील, आढळराव पाटील, बबनराव पाचपुते यांची एकत्रित बैठक घेऊन सामजस्याने मार्ग काढला जाईल."

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्याकडे पूर्ण बहुमत होते. त्यामुळे अजित पवारांची गरज नव्हती, असे म्हणत काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांना शिवसेनेच्या आमदारांनी अर्थखाते ने देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती आहे. या तिढ्यामुळेच शपथविधी होऊन पाच दिवस उलटले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अद्यापही खाती मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT