Yeola News : आज इथे कुणावर टीका करायला आलेलो नसून माफी मागायला आलो, असल्याचे सांगत माझा अंदाज चुकला यापुढे माझ्याकडून चुका होणार नाही. जनतेची पुरोगामी विचारांना साथ आहे, असे सांगत पवार यांनी अजित पवार व भुजबळांचे नाव न घेता टोला लगावला. वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवला येथील सभेच्या दरम्यान केले.
या वेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, श्रीराम शेटे, कोंडाजी मामा आव्हाड, भैय्यासाहेब पाटील, जयदत्त होळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस शरद पवार यांचा पगडी व पैठणी शेला देऊन माणिकराव शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.
पक्षातील बंडानंतर पवार यांनी आज पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली, यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते भुजबळ हे शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू नेते मानले जात होते. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भुजबळांनी पवारांची साथ सोडत बंडाचा झेंडा हाती घेतला.
बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडली. त्यामुळे शरद पवार हे जोमाने पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. पक्षातील बंडानंतर त्यांची आज पहिल्यांदाच भुजबळ यांच्या येवला या बालेकिल्ल्यात जाहीर घेतली. कधीकाळचे भुजबळांचे समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक बनलेले ॲड. माणिकराव शिंदे यांनी पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली होती.
१९८४ नंतर झालेली तोडीची सभा आजची होत असून जनता पवार साहेबावर प्रेम करतात ते माझगावचे पार्सल माझगावला परत पाठवणार असल्याचे यावेळी माणिकराव शिंदे यांनी सांगितले. साहेबांनी ज्यांना मोठे केले तेचे पळून गेले असले तरी आम्ही साहेबांच्या सोबत कायम असल्याचे अंबादास बनकर यांनी सांगितले. पवार साहेबांच्या प्रत्येक आदेशाचा आम्ही अमल करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत पावर साहेबासोबत असणार असल्याचे मारोतराव पवार यांनी सांगितले.
सध्या रंग बदलणारे सरडे जास्त झाले आहे. एकीकडे बाप म्हणायचे आणि दुसरीकडे घाव घालायचा असे बोलत आव्हाड यांनी पंडितराव मुंडे यांचे उदाहरण देऊन पवार साहेबांनी आजपर्यंत कुणाचे घर फोडले नाही. जनता पवार साहेबासोबत कायम आहे. गद्दारी करणाऱ्या घरी बसवू असा टोला लावला.
सध्या महारष्ट्राचे विरोधात षड्यंत्र सुरु आहे. आगोदर ठाकरे सोबत झाले आता पवारांसोबत चालू आहे. हे षड्यंत्र करणाऱ्यांना कधीच सोडणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी केंद्र सरकार कांद्याला भाव मिळू देत नसल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचे पापाचे प्रायश्चीत्य हे भाजपाला (BJP) फेडावे लागले. २०२४ मध्ये पवार साहेब देतील तो उमेदवार निष्ठेने निवडून दिल्यास जे गेल्या पंधरा वर्षात झाले नाही, ते येवल्यात नक्कीच रोजगार उपलब्ध होतील याची ग्वाही दिली.
रोजगार, महागाई आटोक्यात आणता आली नाही. म्हणून दिल्लीतील शकुनी मामा फासे टाकत असल्याचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सांगितले. ज्यांना सर्व दिले त्यांनीच बापाला बेघर केले आहे. मात्र, आजच्या सभेची गर्दी पाहून जनता गद्दारांना जागा दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार मारोतराव पवार, विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, माजी आमदार कल्याणराव पाटील, युवा नेते कुणाल दराडे, हे एकत्र आल्यामुळे भुळबळ यांची अडचण होऊ शकते.
बॅनरबाजी ठरली लक्षवेधी -
शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त येवला बाजार समितीच्या आवारात सर्वदूर शरद पवार यांचे बॅनर झळकले होते. दुसरीकडे छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्री निवड झाल्याने त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या रस्त्यात अभिनंदनाचे मोठे बॅनर लावलेले होते. शरद पवार यांचा एकच फोटो व सोबतीला, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांची छायाचित्रे होती. तर स्थानिक नेत्यांत माणिकराव शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार यांचे फोटो होते. पवार यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर घडयाळ चमकून दिसत होते. तर मंत्री भुजबळ यांच्या समर्थनार्थ असलेल्या बहुसंख्य बॅनरवरून घड्याळ चिन्ह दिसत नसल्याचे चित्र होते.
बाजार समितीच्या आवारात भुजबळांची सत्ता असतानाही पवारांच्या स्वागतास्तव बाजार समितीच्या आवारात मोठा बॅनर झळकत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अलीकडच्या काळातील कार्यकर्ते हे भुजबळांच्या गोटातच असल्याचे चित्र दिसले. मात्र, जुने जाणते कार्यकर्ते मात्र शरद पवार यांच्या गोटात दिसले. माजी आमदार मारोतराव पवार हे उघडपणे पवारांच्या समर्थनात उभे असल्याचे चित्र होते. शरद पवार व छगन भुजबळ यांच्यातील पोस्टर वॉर प्रत्येक जण आवडीने पाहत होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.