Rupali Thombre during a press interaction after her NCP expulsion. The former spokesperson reportedly received offers from Shinde Sena and BJP. Sarkarnama
पुणे

Rupali Thombre : प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झालेल्या रूपाली ठोंबरेंनी पर्याय निवडला? शिंदेंच्या शिवसेनेसह 'या' 2 पक्षांची ऑफर

Rupali Thombre Political party offer's : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाने तापलं आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांची पक्षाकडून प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune News, 11 Nov : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मधील अंतर्गत वादाने तापलं आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या प्रदेश प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाकडून प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

त्यानंतर आता रूपाली ठोंबरे या इतर पर्यायांची चाचपणी करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना काही पक्षांकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर देखील आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या वादाची सुरुवात फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपासून झाली. ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पीडितेचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत गंभीर टीका केली होती.

याचा परिणाम म्हणून पक्षाने ठोंबरे यांना "कारणे दाखवा" नोटीस बजावली. नोटीसमध्ये म्हटलं होतं की, प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी असताना पक्षाच्या महिलाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याविरुद्ध माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्ष शिस्तीचा भंग करणारी आहेत. ७ दिवसांत खुलासा करण्याचे आणि न केल्यास कारवाईचे धोरण नमूद केले होते.

मात्र, या नोटीसीला प्रत्युत्तर देण्यापूर्वीच पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माध्यमातून जाहीर झालेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत ठोंबरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता नाराज झालेल्या रूपाली ठोंबरे पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याचं बोलत आहे.

रूपाली ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच ठोंबरे पाटील यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची देखील ऑफर आली असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे चांगले राजकीय संबंध आहेत.

त्यामुळे ठोंबरे यांना पक्षांमध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून ऑफर देण्यात आली असल्याचे देखील सांगितलं जात आहे. भाजपमधून देखील विचारणा झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतर पक्षांची ऑफर असली तरी सध्या रुपाली ठोंबरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठोंबरे येथे या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मैदानात असतील त्यामुळे स्थानिक गणितांच्या आधारे रुपाली ठोंबरे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्या शिंदे गटाचा पर्याय स्वीकारू शकतात असं सांगितलं जात आहे. याबाबत सरकारनामाशी बोलताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, 'सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे.

प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर माझं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झाला असून येत्या दोन दिवसांमध्ये त्यांची भेट घेणार आहे. अजित पवार हे न्याय करणारे व्यक्ती आहेत. आपल्या पदाधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. त्यामुळे अजितदादांच्या भेटीनंतर योग्य ते निर्णय होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे मला पक्ष सोडावा लागणार नाही. काही लोक स्वतःहून मला पक्षामध्ये येण्याची ऑफर देत आहेत हे ही खरं असलं तरी सध्या माझा पक्ष सोडण्याचा विचार नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT