NCP Agitation in Pune
NCP Agitation in Pune Sarkarnama
पुणे

महाराज; मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नात्याने या देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) करा, असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे आंदोलन करून मांडण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे विधान केले. पंतप्रधान मोदींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.(NCP Agitation in Pune)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीचा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या मनात कायमच द्वेष राहिला आहे. त्यामुळेच ते या भूमीचा कायमच अपमान करीत आले आहेत. ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत.’’

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT