NIA Action Sarkarnama
पुणे

NIA Raid : राजकीय भूकंपानंतर राज्यात NIA ची छापेमारी ; आणखी काही जण..

सरकारनामा ब्युरो़

Pune News : एकीकडे राज्यात राजकीय भूकंप होऊन अनेक घडामोडी होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने (NIA) महाराष्ट्रात छापेमारी सुरु केली आहे.

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएच्या पथकाने मुंबई आणि पुण्यात असे पाच ठिकाणी छापे टाकले आहे. एनआयएने मुंबईतील दोन , भिवंडीतील येथे दोन आणि पुण्यात एका ठिकाणी छापा टाकला आहे.

मुंबईसह पुण्यात एनआयए (NIA) कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. यात ISIS च्या संपर्कात असलेल्याच्या संशयावरून चौघांना अटक केली आहे.

एनआयए आणि आयबीची पुण्यात छापेमारी सुरु आहे. NIA आणि IB च्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये NIA आणि IB पथकाकडून छापेमारी करण्यात आली.

NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

नागपाडा येथील एका रहिवाशाविरुद्ध एनआयएने 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांचा संपर्कात आणखी काही जण संपर्कात असल्याची संशय एनआयएला होता, त्यानुसार हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

त्यानंतर एनआयएला संशय आला की, त्यांच्या आणखी जण संपर्कात आहेत आणि त्यानुसार छापे टाकले. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT