Nilesh Ghaiwal News.jpg Sarkarnama
पुणे

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळवर आणखी दोन गुन्हे दाखल! फरार झाल्यापासून आत्तापर्यंत 'इतके' झाले; कोथरुडमधील फ्लॅट्स...

Nilesh Ghaiwal: बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून निलेश घायवळ यापूर्वीच भारत सोडून फरार झाला आहे. त्याला परत आणण्यासाठी आता पोलिसांची कसरत सुरु आहे.

Amit Ujagare

Nilesh Ghaiwal: कोथरूड गोळीबार प्रकरणातील सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याने समाज माध्यमातून दहशत पसरविणाऱ्या रील प्रसारित केल्या. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे नोंद झाले आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत साखरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घायवळ आणि त्याचे सोशल मीडिया खाते चालवणाऱ्या आणखी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर समाज माध्यमावर घायवळने गुन्हेगारी टोळीचे उदात्तीकरण करून दहशत पसरविल्याचे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अंगद नेमाणे करीत आहेत.

दरम्यान, बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवल्याच्या गुन्ह्यातही निलेश घायवळवर कारवाई झाली आहे. त्याने अहिल्यानगर इथं पासपोर्ट मिळवताना ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असं आडनाव वापरलं होतं. घायवळ हा परदेशात असून, पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधण्यात आला आहे. पासपोर्ट पडताळणीदरम्यान स्थानिक पोलिस अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका आढळल्यानं त्यालाही नोटीस बजावली आहे.

घायवळच्या शास्त्रीनगरमधील घर झडतीत दोन जिवंत काडतुसे, दहा तोळे सोन्याचे दागिने, जमिनींच्या खरेदीखतांची कागदपत्रे जप्त करण्यात आली. पुणे, मुळशी, धाराशीव आणि जामखेड येथील जमिनींसंबंधी पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरून बॅंक खात्यात व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कोथरूड परिसरातील नव्या इमारतींमधील दहा सदनिका जबरदस्तीनं बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणानंतर सचिन फरार असून, पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT