Nilesh Ghaywal News : कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांना चकवा देत परदेशात पळून गेला. विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला. 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' नावाची कागदपत्रे त्याने सादर केली.
गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एनओसी दिले. तसेच पासपोर्ट ऑफीसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला. मात्र, परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.
स्वित्झर्लंडला गेलेला घायवळ हा लवकरच भारतात परतेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्याची सर्व बँक खाती गोठवली आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी आणि मुलगा भारतात परतल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या भीतीने ते पुण्यात आले नसल्याचे सांगितले जाते.
निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रे तयार केली. पोलिस रिकोर्डमध्ये त्याचे नाव निलेश घायवळ आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्याने निलेश गायवळ नावाने आधारकार्ड काढले. गायवळ नावाचे गुन्हेगारी रेकाॅर्ड नसल्याने पासपोर्ट काढणे त्याला शक्य झाले. तसेच पोलिसांना देखील ऑनलाईन यंत्रणेत गायवळच्या नावावर गुन्हे दाखलची माहिती मिळाली नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळची बँक खाती तसेच बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.