Maharashtra Politics : गाढव म्हणत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शिलेदाराचा करारा जवाब; म्हणाले, 'उंदीर...'

Naresh Mhaske Criticizes Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी टार्गेट केले. आता शिंदेंचे शिलेदार खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Naresh Mhaske News : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना गाढवाच्या अंगावर भगवी शाल आंधरली तरी पण तो गाढवच,असे म्हटले होते. ठाकरेंच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

म्हस्के म्हणाले, 'ते आम्हाला गाढव म्हणतात, पण एकनाथ शिंदे हा वाघ आहे आणि ते त्यांनी सिद्ध केले आहे. उलट ठाकरे हे उंदीर आहेत, जे संकटाच्या काळात बिळात लपले होते.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'ज्यांनी आतापर्यंत मुंबईचा मलिदा लुटला, मुंबईचा विकास फक्त रिपेरिंगपुरता ठेवला, ज्यांनी कोविड काळात रुग्णांना खिचडी पुरवठ्यातही भ्रष्टाचार केला, मृतांच्या बॉडी बॅगवरूनही पैसा कमावला त्यांनी आमच्यावर आरोप करणे योग्य नाही.

ठाणे महापालिकेने जी बॅग ३५० रुपयांना घेतली, तीच बॅग मुंबई महापालिकेने साडेसात हजार रुपयांना घेतली. एवढा भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता विसरणार नाही.पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे भरतानाही मलिदा खाल्ला गेला. त्यामुळे आज भ्रष्टाचाराचे धडे आम्हाला देऊ नयेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी ठाकरेंवर केला.

रामदास कदम यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, कदम हे बाळासाहेबांचे विश्वासू होते. त्यांनी बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधी झाल्याचे सांगितले आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण द्यावे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ajit Pawar Satara Tour : अजितदादा अचानकपणे सातारच्या गेस्ट हाऊसवर आले अन्‌ अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन गेले!

गणेश नाईकांना इशारा

वनमंत्री गणेश नाईक यांनी कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होईल, असे विधान केले होते. त्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, आपण ज्येष्ठ आहात म्हणून आम्ही तुमचा मान राखतो. पण बोलताना भान ठेवावे. आमचे कार्यकर्ते जर पलटवार करू लागले तर तुम्हालाच यातना होतील. ताकद असेल तर एकटे लढणार आहोत, असे जाहीर करा. मात्र आपण बोलता तेव्हा तुम्ही म्हणजे भाजप नव्हे, हे लक्षात ठेवा, असा टोला त्यांनी गणेश नाईक यांना लगावला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ratnagiri Assembly bogus voters : ठाकरेंच्या शिलेदारांनं फोडला 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'; बोगस मतदारांची माहिती विधानसभेलाच होती, पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com