Nilesh Lanke  Sarkarnama
पुणे

Nilesh Lanke News: खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली; तातडीने पुण्यात हलवले

Nilesh Lanke health update: निलेश लंके यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर अधिक उपचार आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mangesh Mahale

MP Nilesh Lanke Health Update News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके ( Nilesh Lanke) यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले.

निलेश लंके यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर अधिक उपचार आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांसह अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क सुरू केला आहे. सध्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अहिल्यानगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून निलेश लंकेवर उपचार सुरू होते, पण त्यांची तब्येतीत सुधारणा होत नव्हती, म्हणून त्यांना पुण्यात हलवण्यात आले.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरही “Get Well Soon” संदेशांचा वर्षाव होताना दिसत आहे.

खा.निलेश लंके यांचा संदेश..

सप्रेम नमस्कार,

सततचे कार्यक्रम, आपणापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अविश्रांत धावपळ आणि त्यात यावर्षी उन्हाचा कहर आहे. या सर्वांच्या परिणामामुळे गेल्या दोन-चार दिवसांपासून मला बरं वाटत नसल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी मी आज रुबी हॉस्पीटल, पुणे येथे दाखल झालो आहे. परंतु माझी तब्येत स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

यानंतर मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा एकदा उपस्थित होईन. आपल्या सदिच्छा आणि काळजीचे संदेश माझ्यापर्यंंत पोहोचल्या असून आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचे भरभक्कम बळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करु नये, मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT