Maharashtra Teachers News: शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण बंधनकारक

Maharashtra Teachers 50 Hours Annual Training Mandatory: शिक्षकांना अद्ययावत अध्यापन पद्धती, नवीन शैक्षणिक धोरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रशिक्षण राबवले जाणार आहे.
 Maharashtra Teachers 50 Hours Annual Training Mandatory:
Maharashtra Teachers 50 Hours Annual Training Mandatory:Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार आता राज्यातील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांना दरवर्षी किमान ५० तासांचे ‘सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास’ प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) मुख्य सचिव रणजीत सिंह देओल यांनी काढला आहे.

शिक्षकांना अद्ययावत अध्यापन पद्धती, नवीन शैक्षणिक धोरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रशिक्षण राबवले जाणार आहे. राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही प्रमुख संस्था म्हणून काम पाहणार असून जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

एससीईआरटीच्या परवानगीशिवाय कोणत्याही खासगी संस्था किंवा स्वयंसेवी संघटनांना स्वतंत्र प्रशिक्षण घेता येणार नाही, असे सरकारनं स्पष्ट केले आहे. हे प्रशिक्षण ‘ब्लेंडेड मोड’मध्ये होणार असून ५० तासांपैकी ३० तास प्रत्यक्ष आणि २० तास ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ‘दीक्षा’, ‘स्वयं’ आणि ‘निष्ठा’ यांसारख्या शासकीय प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार आहे.

 Maharashtra Teachers 50 Hours Annual Training Mandatory:
Maharashtra revised NPS: सरकारी कर्मचाऱ्यांनो, सुधारित पेन्शन योजना नेमकी काय? सोप्या भाषेत समजून घ्या!

प्रशिक्षणाची संपूर्ण नोंद ‘विद्या समीक्षा केंद्र’ पोर्टलवर केली जाणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तिकेतही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांविरोधात कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत.

 Maharashtra Teachers 50 Hours Annual Training Mandatory:
Teacher Recruitment News: राज्यात 13 हजार शिक्षकांची भरती; एका अटीमुळे काही उमेदवारांच्या स्वप्नांवर फिरणार पाणी?

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक निवडताना गुणवत्ता निकष लागू करण्यात येणार असून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी असलेल्या शिक्षकांनाच संधी दिली जाणार असल्याचे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com