Pune News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धडाडीने निर्णय घेण्यासाठी आणि प्रशासनाकडून ते कार्यक्षमतेने राबवून घेण्यासाठी जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या चटपटीत खाण्याच्या सवयींमुळेही चर्चेत असतात. गडकरी हे दर्दी खवय्ये आहेत, हे तर राज्यासह देशाला माहिती आहे. अगदी 'स्ट्रिट फूड'पासून विविध देशांतील चवदार पदार्थ 'ट्राय' करायला त्यांना नेहमीच आवडते. चायनीज, मेक्सिकन, इटालियन असं कोणतंही 'क्युझिन' ते आवडीने 'ट्राय' करतात. घरात जरी कोणी यातील कोणताही पदार्थ केला तर तो ते आवडीने खातात. (Latest Political News)
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या गडकरींनी (Nitin Gadkari) माजी आमदार मेधा कुलकर्णींच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला. खरे तर गडकरी मेधाताईंची नाराजी दूर करण्यासाठी गेल्याचे बोलले जात होते. मात्र या गडकरींच्या खाण्याची आवड जाणाऱ्या मेधाताईंनी त्यांच्या खास पाणीपुरी, शेवपुरी बनवली होती. ती गडकरींनी खाल्ली आणि पाणीपुरी आवडल्याचेही सांगितले. यामुळे गडकरींच्या खवय्येगिरीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या उदघाटन सोहळ्यावरून मेधा कुलकर्णींनी (Medha Kulkarni) जाहीरपणे नाराजी व्यक्त करून नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांवर आरोप केले. मेधाताईंची नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी स्वतःहून पुढाकार घेतला. यानंतर त्यांनी कोथरूड येथील कुलकर्णींच्या घरी जाऊन चर्चा केली. यावेळी मेधाताईंनीही गडकरींचे मोठ्या उत्साहात आदरातिथ्य केले. यावेळी त्यांनी गडकरींच्या आवडीनुसार खास पाणीपुरी आणि शेवपुरी बनवली होती. ती आवडल्याचे सांगून त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली, याबाबत मात्र त्यांनी सांगण्याचे टाळले.
अलीकडे वाढते वयोमान आणि आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांच्या या खवय्येगिरीवर बंधने आली आहेत. शिवाय 'झेड प्लस' सुरक्षा असल्यामुळेही गडकरी यांना सहजपणे कुठेही जाऊन खाणे शक्य होत नाही. पण तरीही गडकरींकडे गेल्यावर कोणताही अभ्यागत चविष्ट काहीतरी खाल्ल्याशिवाय परत येत नाही. पुडाची वडी, सांबार वडी, भेळ, पापडी चाट अगदी मुंबईतला वडापावही त्यांना आवडतो. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, असे जरी म्हणत असले तरी गडकरींचे आवडीच्या पदार्थांची यादी बघितली तर ते खाण्यावर मनस्वी प्रेम करतात हे सहज दिसते. विविध मुलाखतींमधून त्यांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी पण त्यांच्या आवडीनिवडी सांगितल्या आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.