Nitin Karir Sarakrnama
पुणे

Nitin Karir : पुण्यात 'BRT'चं जाळं निर्माण करणारे अन् सायकल ट्रॅकचीही संकल्पना मांडणारे नितीन करीर!

Chief Secretary of Maharashtra : राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार नितीन करीर यांनी आज स्वीकारला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.1988च्या बॅचचे IAS असलेले डॉ. नितीन करीर यांनी यापूर्वी पुण्याच्या आयुक्त पदाचा पदभार सांभाळला होता. या कार्यकाळातील धडाकेबाज निर्णयामुळे ते नेहमी चर्चेत राहिले होते. त्यांनी त्या काळामध्ये अनेक असे प्रकल्प पुण्यामध्ये राबवले ते शहराच्या विकासात मैलांचा दगड ठरले आहेत.

डॉ. नितीन करीर हे 2004 ते 2007 पर्यंत पीएमसीचे आयुक्त होते. त्यांच्या कार्यकाळात, सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर (CFC) किओस्क आणि Unwire Pune, wi-fi प्रोजेक्ट स्थापना त्यांनी केली. त्या काळामध्ये असे प्रकल्प राबवणारी पुणे महापालिका(Pune Municipality) ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. या प्रकल्पाचा अनुकरण यानंतर अनेक महापालिकांनी केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉक्टर करीर यांनी त्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले असले तरी शहरांमध्ये सायकल ट्रॅक उभारणे आणि बीआरटीचे जाळे निर्माण करणे हे त्यांचे महत्त्वकांक्षी निर्णय होते.

डॉ.नितीन करीर(Nitin Karir) महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असताना बीआरटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता . पुण्यात कात्रज- स्वारगेट- हडपसर मार्गावर पथदर्शी बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला. त्याला चांगले यश मिळू लागल्यामुळे पुण्यात 100 किलोमीटरच्या बीआरटी जाळे निर्माण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधीही महापालिकेला दिला.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या पदावर असताना अजित पवार यांच्या हस्ते ऑगस्ट 2015 मध्ये विश्रांतवाडी ते महापालिका, सप्टेंबर 2015 मध्ये सांगवी ते किवळे, एप्रिल 2016 मध्ये नगर रस्ता बीआरटीचे उद्‌घाटन झाले. पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी प्रकल्प अजूनही चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

सायकल ट्रॅकची संकल्पना मांडली -

तत्कालीन महापालिका आयुक्त नितीन करीर यांनी सायकल ट्रॅकची संकल्पना मांडली. पुणे हे सायकलींचे शहर असल्याचे मार्केटिंग जोरात करण्यात आले; आणि शहरातील रस्त्यारस्त्यांवर अचानक सायकल ट्रॅक अवतीर्ण झाले. हे ट्रॅक वेगळे दिसावेत म्हणून ते इंटरलॉकिंग ब्लॉकचे बनविण्यात आले. कालांतराने आता ते सायकल ट्रॅक शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT