Pune News प्रशासनाचा घोळ; पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची तारीख चुकणार

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेतर्फे दिवाळीला कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते.
Pune Pmc
Pune Pmc Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेतर्फे दिवाळीला कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यासाठी प्रत्येक विभागाकडून बिल तयार करण्याचे काम सुरू होते. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. मात्र, पालिकेने सहाव्या वेतन आयोगानुसार बिल तयार केले. त्यामुळे मोठी चूक झाली. सर्वच विभागांमध्ये हा प्रकार घडल्याने सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी पुन्हा बिल तयार करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनस मिळतो. यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्त्याच्या रकमेवर 8.33 टक्के बोनस, 21 हजार रुपये सानुग्रह अनुदान याचा समावेश असतो. याबाबत लेखा व वित्त विभागाने परिपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास पगाराएवढीच रक्कम मिळते.

Pune Pmc
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा भार महापालिकेच्या (Corporation) तिजोरीवर पडतो. यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना बोनस लवकर मिळावा, यासाठी ९ ऑक्टोबर रोजीच बोनसची बिले तयार करण्याचा आदेश देण्यात आला होता. 1 तारखेनंतर लगेच हे पैसे बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू होते.

मागील वर्षापासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. बोनसची बिले काढताना या वेतन आयोगानुसार कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, सर्वच विभागांनी सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसार बोनसची बिले तयार केली गेली. बोनसची रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर बिलांची फेरतपासणी करण्यात आली. त्यामध्ये ही चूक लक्षात आली. त्यामुळे प्रत्येकाच्या बोनसमध्ये १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत तफावत आली होती. आता पुन्हा नव्याने बोनसची बिले तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बोनस जमा होण्यासही विलंब होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Pune Pmc
MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणात शुक्रवारी राहुल नार्वेकर मोठा निर्णय देणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com